राज्यात राजकीय अस्थिरता नको, पक्षांतर बंदी कायदा कडक करा; शाहू महाराजांचा हल्लाबोल

राज्यात राजकीय अस्थिरता नको, पक्षांतर बंदी कायदा कडक करा; शाहू महाराजांचा हल्लाबोल

Sharad Pawar Kolhapur Sabha : आज आपल्या देशात काय सुरु आहे. कोणाला इकडे विकत घेतलं जातंय, कोणाला तिकडे विकलं जातंय. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा आणला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात तो आणखी मजबूत केला. पण आज जर परिस्थिती पाहिली तर या कायद्याला बगल देऊन आपलं कार्य करुन घेतलं जातंय. हा कायदा आहे किंवा नाही हा मोठा प्रश्न आहे. त्याला दुरुस्त करायाचे किंवा नाही हा दुसरा प्रश्न आहे. त्याला काढून टाकले तर बरं होईल म्हणजे प्रत्येकाला आपलं काम करता येईल, असा हल्लाबोल श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापूरच्या सभेतून केला.

पक्षांतर बंदी कायदा ठेवयाचा असेल दुरुस्त केला पाहिजे. कारण आज जी महाराष्ट्रातील परिस्थिती झाली आहे, त्यामध्ये कुठेही स्थिरता नाही. चलबिचल परिस्थिती आहे. तीन तीन वेळा सरकार बदलत आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत सरकार बदलत आहे. अशी अस्थिरता आपल्या राज्यात नको आहे. यासाठी हा कायदा दुरुस्त केला पाहिजे, अशी मागणी शाहू महाराज यांनी केली.

काही दिवसांपूर्वी आमचे मंत्री भेटयाला आले होते. त्यावेळी मी त्यांना एकच प्रश्न विचारला. आत्ता जे काही घडलंय ते कसं घडलंय? केव्हा घडलंय? आणि कशासाठी घडलंय? हे मला येऊन स्पष्ट करा पण त्यांना अजून वेळ मिळाला नाही. आणि त्यांच्याकडून स्पष्टीकरण आलेलं नाही. आता हा जाब आपल्याच विचारावा लागेल, असा हल्लाबोल कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला.

गद्दारांना कोल्हापुरी पायताण दाखवा; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

आपला जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात पुरोगामी जिल्हा आहे. महाराष्ट्र म्हणजे देशातील सर्वात पुरोगामी राज्य आहे. जे कोल्हापूरात घडतंय ते आपण म्हणतो महाराष्ट्रात घडतंय ते देशातही घडतंय. पण अलिकडच्या काळात दिसून येत नाही. यासाठी आपल्या दुरुस्ती करण्याची गरज आहे, असे शाहू महाराज यांनी म्हटले.

महाराष्ट्रासाठी फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा विचार महत्वाचा आहे. या विचाराने आपण पुढं चाललो आहे. या विचाराने आपल्या स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली पण आपली दिशाभूल होतीय का? चुकीची दिशा आपण घेतोय का? असे आता लोकांना वाटायला लागले आहे. पुन्हा एकदा आपण योग्य दिशेला येण्याची गरज आहे. लोक एकत्र राहिले तर देशाच्या राजकारण बदल करु शकतो. आपले संविधान आपली ताकद आहे. त्याचे मलभूत तत्वे कोणीही बदलू शकत नाही, अशी टीका शाहू महाराज यांनी मोदी सरकारवर केली.

शरद पवारांबद्दल बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, ’40 वर्षामध्ये पहिल्यांदाच…’

राज्यात काही दिवसांत वेगवेगळ्या घटना घडल्या. त्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच कोल्हापूरला आले आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीने दाखवून दिले की कोल्हापूर एक पुरोगामी विचाराचे आहे. हा विचार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जायचा आहे, असे शाहू महाराज यांनी म्हटले.

कोल्हापूर जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. आधुनिक काळात राजर्षी शाहू महाराज यांनी समतेचा विचार रुजवला हा विचार कोणत्याही पक्षाला पुढं घेऊन जावाचं लागतो. महाराष्ट्राने हा विचार मान्य केला आहे पण अधूनमधून विसर पडतो. कोल्हापूर जिल्हा अनेक वर्षे शरद पवार यांच्या बाजूने उभा राहिला आहे. पण अधूनमधून काय घडतंय हे काही कोणाच्या लक्षात येत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube