‘साप बिळातून बाहेर पडले, गद्दारांना कोल्हापुरी पायताण दाखवा’; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
Jitendra Awhad : अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या (NCP) काही आमदारांनी पक्षात बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) या बंडखोर आमदारांच्या विरोधात सभा घ्य़ायला सुरूवात केली. त्यांनी येवला, बीड आणि आज कोल्हापुरात सभा घेतली. या सभेत बोलतांना आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी बंडखोर आमदार आणि भाजपचा जोरदार समाजार घेतला. गद्दारी ही रक्ताच असते. या गद्दार सापांना कोल्हापुरी पायताण दाखवा, असं आव्हाड म्हणाले.
कोल्हापुरच्या सभेत बोलतांना आव्हाड म्हणाले, कोल्हापुरात एक रायफल क्लब होता. त्याला फायनान्स शाहू महाराजांनी केला होता. शाहू महाराजांनी उघडपणे त्या क्लबला मदत केली. नंतर त्या रायफल क्लबमध्येच बॉम्ब सापडले. चौकशीअंती समोर आलं की, हे बॉम्ब त्यांच्या हत्येसाठी आणले होते. याचा अर्थ हा की, गद्दारी ही काही लोकांच्या रक्तातच असते. आतापर्यंत साप बिळात होते, आता बिळातून पाहेर पडले. या सापांना ठेचण्यासाठी आपल्याला पायताणाचा उपयोग केला पाहिजे. कोल्हापुरात पायताण फेमस आहे. याच पायतानाचा उपयोग महाराष्ट्रानं गद्दारांसाठी केला पाहिजे आणि ते तुम्ही कराच, असं आव्हान आव्हाडांनी केलं.
व्लादिमीर पुतिन यांना वाटते भारतात येण्याची भीती, G20 परिषदेला मारणार दांडी
पवारांना घरी बसं वय, झालं असं अजित पवार गटाने सांगितलं होतं.यावर बोलतांना आव्हाड म्हणाले, सगळ्या उस्तादांना भेटायला एक वस्ताद आला. कुस्ती त्यांच्याशी आहे. आमच्याशी नाही. आमचा वस्ताद लय भयंकर आहे. ते स्वत:च म्हणतात येता का कुस्ती खेळायला? त्यांना पाहून समोरच्याची पातळ होते, असा इशारा आव्हाडांनी दिला.
देशात आणि राज्यात भीषण चित्र आहे. मनिपुरमध्ये दोन महिलांना नग्ण करून त्यांच्यावर त्यांच्या घरच्यासमोर अत्याचार केला. सरकार विचारतं, हा व्हिडिओ व्हायलर का केला? त्यांना न्याय कोण देईल? शाहू महाराज आणि छत्रपती महाराज असते तर तुमचं डोक उडवलं असतं, असं आव्हाड म्हणाले.
मेवात मध्ये दंगल होते.हरियाणा पेटलं. मात्र, केंद्र सरकार काही करत नाही. कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेतल्या जात नाही. इलेक्शन कमिशन हा केंद्र सरकारच्या हातचं बाहुलं झालं. तलाठी परिक्षेसाठी हजार रुपये फि घेतली जाते. शंभर रुपये भरायची ताकद नसलेल्या मुलांकडून १०० रुपये घेतले जातात. हा अन्याय आहे. कांद्याचे भाव वाढले म्हणून निर्यात कर वाढवला. शेतीतला माल पडला तरी चालेल, आम्ही परदेशातून माल आणू. प्रोडूसर मेला तरी चालेल. मात्र, कंझ्युमर जगला पाहिजे, हे सरकारचं धोरण आहे.त्यामुळं आता शेतकऱ्यांना उठाव करावाचा लागेल, अस आव्हाड म्हणाले.