नागपूर : अजितदादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये असे विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज (दि.27) राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात भाषण करताना विधानसभेच्या जागा वाटपावरून परखड भूमिका मांडली. त्यांच्या या विधानानंतर लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबंत सुरू झाल्याचं दिसून येत आहे. भुजबळांनी भाजपनं आपल्याला 80-90 जागा देण्याचा शब्द दिल्याचे अधोरेखित केले. भुजबळांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे. फडणवीसांच्या उत्तरानंतर लोकसभेत जागा वाटपावेळी झालेला खटोटोपचं राष्ट्रवादीच्या वाटेला येणार असल्याचे बोलले जात आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (Devendra Fadnavis On Chhagan Bhujbal Statement Over Vidhan Sabha Seat Sharing )
गृहमंत्री असलेले गोपीनाथ मुंडे पुण्यात आले अन् थेट ‘पबवरच’ रेड टाकली…
काय म्हणाले फडणवीस?
राष्ट्रवादीच्या बैठकीदरम्यान भुजबळांनी लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये असे सांगत भाजपनं 80-90 जागा देण्याचा शब्द दिल्याचा दावा केला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे, निश्चितच सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील. तसेच, इतर सहकारी पक्षांना किती जागा द्यायच्या ते आम्ही एकत्र बसून ठरवू, असे फडणवीस म्हणाले.
राऊतांवर हल्लाबोल
संजय राऊतांवर बोलताना फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला ते म्हणाले की, संजय राऊत यांच्याबद्दल मला प्रश्न विचारत जाऊ नका. जे लोक गांजा पिऊन लेख लिहितात मी त्यांच्यावर बोलत नाही असे ते म्हणाले. सध्या राऊत लंडनला आहेत तिथे चांगले मानसोपचार मिळतात, त्यामुळे त्यांनी योग्य तो औषधोपचार घेतला पाहिजे असा टोला फडणवीसांनी लगावला.
भुजबळांच्या लोकसभा उमेदवारीसंदर्भात राजकारण झालं; प्रफुल पटेलांचा खळबळजनक खुलासा
…त्यांना आताच सांगून टाका
राष्ट्रवादीच्या मेळाव्याला संबोधित करतान भुजबळ म्हणाले होते की, महायुतीमध्ये आपल्याला विधानसभेसाठी योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हा भाजपनं आपल्याला 80-90 जागा मिळतील असे सांगितले होते. पण, लोकसभेसाठी जी काही खटपट झाली ती पाहता पुढे ही खटपट होता कामा नये. त्यामुळे अजित पवार गटाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे हे भाजपला ठासून सांगावं लागेल. आपल्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे जागा दिल्या तर, त्यातील 50 ते 60 जागा निवडून येती असेही भुजबळ म्हणाले. तुमचे 50 आहेत, मग 50 घ्या, असं होता कामा नये. त्यामुळे आताच त्यांना सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे असं छगन भुजबळ म्हणाले.
🕞 3.30pm | 27-5-2024 📍 Nagpur | दु. ३.३० वा. | २७-५-२०२४ 📍 नागपूर.
LIVE | Media Interaction#Nagpur #Maharashtra https://t.co/nwvz4OH4ar
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 27, 2024