Download App

एसआयटी चौकशी रद्द केली फक्त शेंगा हाणल्या; जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर संशय

मराठा आंदोलक यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चौकशी झाली. त्यामध्ये फडणवीसांनी एसआयटी रद्द केल्याचं म्हटलं आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Fadnavis calls Manoj Jarange Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विश्वासू आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दरम्यान, राऊत यांच्या फोनवरून जरांगे आणि फडणवीसांची चर्चा झाली. त्यांनी मराठा आंदोलकांविरोधात सुरू केलेली एसआयटी चौकशी रद्द केली असं सांगितलं. परंतु, हातात पत्र नाही. (Maratha reservation) त्यामुळे खरच रद्द केली की शेंगा हाणल्या अशी प्रतिक्रिया देत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीसींवर संशय व्यक्त केला आहे.

शेंगा हाणल्या मराठा ओबीसीमधूनच आरक्षण घेणार; नेत्यांनी विरोध करण्यापेक्षा सहकार्य करावं -जरांगे पाटील

या सरकारला कायद्याच्या कसोटीवर टिकणाऱ्या आरक्षणासाठी एक महिना वेळ दिला आहे असंही जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं. यावेळी आपलं फडणवीसांशी काय बोलणं झालं अस विचारलं असता होय माझं त्यांच्याशी बोलणं झालं. तारीख संपली. आम्ही एसआयटी चौकशी बंद करत आहोत असं फडणवीस म्हणाल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. तसंच, आंदोलनावेळी झालेल्या केसेसही मागे घेत असल्याचेही सांगितलं. मात्र, हातात पत्र नाही. त्यामुळे खरच एसआयटी रद्द केली का शेंगा हाणल्या हे काही माहित नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

शहागड येथे कार्यालय स्थापणार

मी समाजासाठी लढत आहे, कुठेही असलो तरी माझं आंदोलन सुरूच आहे. मंत्री देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच सर्व समाजाची बैठक पार पडणार आहे. आपल्या हक्काचे एक कार्यालय शहागड येथे स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अंतरवाली सराटी येथील नागरिकांचे व गावाचे उपकार मी कधीही विसरणार नाही. आता सर्व घडामोडी मुंबईतून घडणार आहे. त्यामुळे सतत गावात गर्दी होऊ नये, यासाठी शहागड येथे कार्यालय सुरु करून तिथून काम पाहणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

follow us

वेब स्टोरीज