Devendra Fadnavis on Ramdas Kadam : विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूने मुख्य तीन-तीन पक्ष रिंगणात आहेत. त्यामुळे अनेकदा अनेक नेत्यांच्या वक्तव्यांवरून राजकारण तापतं. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर थेट घणाघात केला आहे. त्यामुळे महायुतीचा घटकपक्ष असताना असं होत असेल तर यांच्यात नक्की काय चाललय अशी चर्चा रंगतो. दरम्यान, यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वारंवार भाजपवर असं बोलण योग्य नाही. याने मन दुखावतात. त्यामुळे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या विषयावर बोलणार आहोत असं सागितल. ते माध्यमांशी बोलत होते.
दिलीप खेडकर लाच प्रकरण; रामदास कदमांचं आदित्य ठाकरेंकडं बोट, नक्की काय आहे आरोप?
काय म्हणाले फडणवीस?
अशा प्रकारे माध्यमांसमोर आरोप करणे हे चुकीचं आहे. त्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी ते युतीमध्ये मांडावं. रामदास कदम यांचं जे म्हणणे असेल ते आम्ही समजून घेऊ, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांना सुनावलं आहे. रामदास कदम हे वारंवार टोकाचं बोलतात. त्यामुळे आमच्या देखील भावना दुखावल्या जातात. आम्ही देखील माणसं आहोत. वारंवार भारतीय जनता पक्षाला बोलणं, हे आम्हाला मान्य नाही. यासंदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते रामदास कदम?
दापोलीमधील भाजपची मंडळी राक्षसी महत्त्वकांक्षा घेऊन पुढे येत आहेत. २०१९ मध्ये युती असतानाही योगेश कदम यांना त्यांनी मतदान केले नाही. प्रत्येकवेळी योगेश कदम यांना बदनाम करून अडचणीत आणण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे असं रामदास कदम म्हणाले होते. त्यावरून आता महायुतीतच कलगी तुरा रंगला आहे. हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्या आहेत. कारण आम्ही विश्वास ठेवत भाजपसोबत आलो आहे. परंतु, आमचा विश्वासघात होत आहे अशी आरोपही त्यांनी केला होता.