Devendra Fadnavis : महाविकास आघाडीमध्ये फक्त लाडकी मुलगी आणि लाडका मुलगा या दोन योजना चालतात अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत आयोजित भाजपचा लाडक्या बहिणीचा ‘देवा भाऊ’ कार्यक्रमात बोलताना केली.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये (MVA) जे पक्ष आहे यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडकी बहीण नाही आहे. यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडका मुलगा आणि लाडकी बहीण आहे. मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा पंतप्रधान झाला तर माझा मुलगा आणि मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी. यांच्याकडे अशा दोनच योजना चालतात अशी टीका या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्याकडे बारा कोटी जनतेतील महिला आमच्या भगिणी आहेत. ही राखी असं कवच आहे जे माझा कोणी काही करू शकणार नाही. आता मी हे कवच घेऊन मैदानात जातो आणि तुमच्यासाठी संघर्ष करून वेगवेगळ्या योजना घेऊन येतो अशी देखील यावेळी देंवेंद्र फडणवीस म्हणाले.
31 मार्चपर्यंतचे पैसे बजेटमध्ये ठेवले : देवेंद्र फडणवीस
लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर टीका करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही योजना बंद होणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ही योजना बंद करण्यासाठी ते कोर्टातही गेले. तुम्ही तुमच्या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका. ते कालही काही देत नव्हते आणि आजही काही देत नाही.
कसारा घाटात भीषण अपघात, वाहन दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू
आम्ही तुमच्या आर्शीवादाने 31 मार्चपर्यंतचे पैसे बजेटमध्ये ठेवले आहे. आमचे सरकार पुन्हा येणार आणि ही योजना सुरु राहणार. बजेटमध्ये एकाच वर्षाचे पैसे ठेवता येतात, जर पाच वर्षाचे पैसे ठेवता आले असते तर आता ठेवून दिले असते असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच विधानसभेत 100 महिला पाहायला मिळतील आणि लोकसभेत दुप्पट महिला पाहायला मिळतील असेही यावेळी ते म्हणाले.
Rakesh Pal : मोठी बातमी! भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन