Download App

फडणवीसांचं नेतृत्त्व, धन्यवाद यात्रा अन् विधानसभा; महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग

देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपचे नेते राहतील असं पुन्हा एकादा स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.

  • Written By: Last Updated:

BJP Special Thanks Rally Starts In July 2024 : लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजप धन्यवाद यात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील ५ वर्षात होणारी विकासकामे व योजनांचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हायला हवा. महाराष्ट्रातील सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी जुलै महिन्यात धन्यवाद आभार दौरा करणार आहेत. ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाणार आहोत त्यांच्याकडे मोदी सरकारच्या नवीन योजना देखील पोहचवणार आहोत अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे.

फडणवीसच नेतृत्त्व करणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच महाराष्ट्रात भाजपाचे नेते असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. (Chandrasekhar Bawankule) सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली आहे असंही बावनकुळे म्हणाले.

राज्य सरकार कसं हातात येत नाही तेच बघतो  शरद पवारांची विधानसभेसाठी  पेरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना महाराष्ट्रात आणण्यासाठी महायुतीचं सरकार काम करेल. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आवश्यक आहेत. दिल्लीमध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेविषयी ते म्हणाले की, ज्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अर्धा टक्केपेक्षा कमी मतांनी मागे राहिला, त्याविषयी केंद्रीय नेतृत्वासोबत कारणांची चर्चा व विचार विनिमय केला. जेथे कमी पडलो आहोत, त्या ठिकाणी अधिकचे काम करून विधानसभेत ही पोकळी भरून काढण्यासाठी काम करू, असंही ते म्हणाले यावेळी म्हणाले आहेत.

खालच्या पातळीवर टीका केली

शरद पवारांवर बोलताना बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी एखाद्या शब्दाने टीका केली, तुम्ही मागील दीड वर्षापासून मोदी यांच्यावर काय-काय बोलत आहात? असा प्रतिसवार उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनेही त्याची नोंद घेतली आहे. यशाने ते थोडे हुरळले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर किती खालच्या पातळीवर टीका करण्यात आली या गोष्टीचा अभ्यास शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीने केला पाहिजे, काय काय शब्द वापरले याचाही विचार करावा असंही ते म्हणाले आहेत.

आम्ही असं बोललो नाही आरक्षणावर बोलायचं असेल तर नीट बोला, नाहीतर बोलू नका; निंबाळकरांच्या  त्या वक्तव्यावर जरांगे संतापले

विधानसभेत अजित पवार महायुतीसोबत असणार आहे का? या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले, महायुतीच्या सर्व नेत्यांना एकत्र काम करत महायुतीच्या माध्यमातून पुढे जायचं आहे. महायुतीला पुढे नेण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे अजित पवार गटाकडून सांगण्यात येतय की अजित पवार यांना टार्गेट केलं तर आम्ही आमचा वेगळा विचार करू त्यावर कोणी आणि का म्हटलं? आमच्याकडून असं कोणीही बोललेलं नाही, आमच्याकडून असा कोणी प्रयत्न देखील करत नाही असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं.

follow us

वेब स्टोरीज