Mahayuti Government : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाच डिसेंबरला कोण शपथ घेणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. महायुतीने शपथविधीचा मुहूर्त जाहीर केला आहे. (Mahayuti)पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी समांरभाला येणार असल्याचे जाहीर केले आहे. पीटीआयने वरिष्ठ नेत्याच्या हवाल्याने वृत्त देताना देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून निश्चित झाले असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे नागपुरातील गोविंदा कलेक्शनचे पिंटू मेहाडिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी त्यांच्या आवडत्या रंगाचे चार कोट शिवले आहेत. यापैकी एक कोट घालून देवेंद्रजींनी शपथ घ्यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. हे सर्व कोट घेऊन ते मुंबईला रवानासुद्धा झाले आहेत.
पंकजा मुंडे मुख्यमंत्री?, पवारांच्या पक्षातही भाकरी फिरणार; रोहित पवार नेमकं काय म्हणाले
देवेंद्र फडणवीस हे नेहमीच गोविंदा कलेक्शन येथून कोट शिवतात. पहिल्यांचा महापौर झाले तेव्हासुद्धा त्यांनी येथूनच कोट शिवून घेतला होता. फडणवीस यांना निळा रंग आवडतो. हे बघता खास निळ्या रंगाचे तीन शेडमध्ये कोट शिवण्यात आले आहेत.
एक कोट राखडी रंगाचा आहे. फडणवीस नेहमीच शर्ट, पँटमध्ये वावरतात. खास प्रसंग वा कार्यक्रमात ते कोट घालतात. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी नियमित जॅकेट घालणे सुरू केले. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात गुलाबी रंगाचे जॅकेट घातले होते.
गुलाबी रंगाबाबत त्यांना विचारण्यात आले होते तेव्हा ते म्हणाले, मी नेहमची वेगवेगळ्या रंगाचे कोट घालतो. त्यात गुलाबी रंगाचाही समावेश आहे. मुद्दाम गुलाबी रंगाचा कोट घातलेला नाही.