Greetings CM Fadnavis Mahaparinirvana Day : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि अन्य महत्त्वाच्या नेते उपस्थित होते. (Mahaparinirvana) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि अन्य नेत्यांनी नरेंद्र जाधव लिखित पुस्तकाचे प्रकाशन देखील केले.
संविधानाची महत्त्वता केली स्पष्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात देशाच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे, आणि यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. “भारताचे संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे, आणि कोणत्याही समस्येचे समाधान संविधानच देऊ शकते,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राणे, चव्हाण, फडणवीस अन् शिंदे.. कहाणी चार मुख्यमंत्र्यांच्या डीमोशनची
त्यांनी पुढे असे सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केवळ लिहलेच नाही, तर ते अंमलात आणण्याचे व्हिजन देखील त्यांच्यात होते. आजच्या समाजातील प्रत्येक पायाभूत बाबी आणि धोरणे या सर्वात बाबासाहेबांचे विचार प्रतिबिंबित होतात. तसंच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय संविधानाचे पालन करण्याचे त्यांचे दृढ संकल्प व्यक्त केले. “धर्मग्रंथापेक्षा आमच्यासाठी संविधान महत्त्वाचे आहे. सरकारच्या प्रत्येक निर्णयामध्ये वंचित समाजाचा विचार केला जाईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर ठेवूनच प्रत्येक पावल उचलले जाईल असंही ते म्हणाले.
जगाच्या पाठीवर भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे. देशासमोर कुठलीही समस्या असली तरी त्याचा निदान आणि उपाय भारताचे संविधान हेच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा बंधुतेचा एक संदेश दिला तो संदेश देखील महत्वाचं आहे, असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बाबासाहेबांना अभिवादन करताना त्यांचे विचार आणि योगदान लक्षात घेतले पाहिजे अशी भावना व्यक्त केली. तसंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शावर आधारित प्रत्येक जिल्ह्यात ‘संविधान मंदिर’ उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.