Download App

Union Budget 2023 : ‘हा’अर्थसंकल्प अमृत कालातील सर्वजन हिताय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

  • Written By: Last Updated:

मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प अमृत कालातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले

याचबरोबर “विशेषता पुढच्या २५ वर्षांमध्ये जो एक विकसित भारत आपण म्हणतोय. त्याच्याकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने स्पष्टपणे दाखवला आहे. याला ग्रोथ बजेट म्हणता येईल, ग्रीन बजेट म्हणता येईल, याला पायाभूत सविधांचं बजेट म्हणता येईल, याला मध्यमवर्गीयांचं बजेट म्हणता येईल, याला शेवटच्या व्यक्तीचा विचार करणारं बजेट म्हणता येईल. अशा सर्व प्रकारच्या लोकांना या अर्थसंकल्पाच्या माध्यामातून मोठ्याप्रमाणात मदत मिळते आहे.” असंही फडणवीसांनी सांगितलं.

याशिवाय “दहा लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक ही देशात मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती करणारी आहे. २७ कोटी लोक ईपीएफओच्या अंतर्गत येणं म्हणजे गेल्या आठ वर्षात औपचारिक क्षेत्रात वाढलेला रोजगार हा स्पष्टपणे दिसतो आहे. या पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीमुळे प्रचंड मोठा फायदा होणार आहे.” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

Tags

follow us