Download App

देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी, उद्धव ठाकरेंचा ‘शिल्लकसेना’ असा उल्लेख

शिल्लकसेनेची एकही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली नसून पोपट आता मेलाय असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीकेची तोफ डागली आहे.

पुण्यात आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा शिल्लकसेना असा उल्लेख केला आहे.

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात आणखी फेरबदल, दिग्गज मंत्र्याचे खाते काढले

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिल्लकसेनेने सर्वोच्च न्यायालयात एकूण आठ मागण्या ठेवल्या होत्या. मात्र, त्यातली एकही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे पोपट आता मेला असून हे सरकार पूर्णपणे कायदेशीर आणि संविधानिक असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Pakistan News: इम्रान खानला दुसऱ्यांदा अटकेची शक्यता, घरात दहशतवादी लपल्याचा आरोप

तसेच राज्यात स्थापन झालेलं हे सरकार कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा निवडूनही येणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी कर्नाटक निवडणुकीवरुनही विरोधकांना टोलेबाजी केलीय. ज्यांच्या घरी पोरगा पैदा झाला नाही तेही आनंद साजरा करीत असल्याचा टोला त्यांनी राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला लगावला आहे.

कर्नाटक निवडणुकीत भाजपला मोठ्या मताधिक्क्याने पराभवाला सामोरं जावं लागलं असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. या टीकेलाही फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, कर्नाटकात आमच्या जवळपास 42 जागांवर 2 ते 3 हजार मतांनी पराभव झाला आहे. तर 7 जागांवर 500 ते 700 मतांनी पराभव झाला असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Tags

follow us