तुम्ही दंगली घडवायच्या ठरवले आहे का? फडणवीसांचा आव्हाडांना सवाल

Devendra Fasanvis On Jitendra Awad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि वाद हे जणू आता समीकरणच तयार झालं आहे. गेल्या वर्षी आव्हाड यांच्यावर हर हर महादेव (Har Har Mahadev) या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. हे प्रकरण शांत होत नाही, तोच एका महिलेने […]

Devendra Fadnavis Jitendra Awhad 696x364

Devendra Fadnavis Jitendra Awhad 696x364

Devendra Fasanvis On Jitendra Awad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि वाद हे जणू आता समीकरणच तयार झालं आहे. गेल्या वर्षी आव्हाड यांच्यावर हर हर महादेव (Har Har Mahadev) या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. हे प्रकरण शांत होत नाही, तोच एका महिलेने आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. दरम्यान, आताही आव्हाड यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जणू रामनवमी (Ram Navami), हनुमान जयंती (Hanuman Jayanti) दंगलीसाठीच झालीय की काय असे वाटते, असं वादग्रस्त विधान आव्हाड यांनी केलं आहे. या प्रकरणी भाजपच्या (BJP) वतीने निदर्शने करत अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती ही दंगलींसाठी साजरी केली जाते, असे विधान करणे, हा समस्त समाजाचा आणि रामभक्तांचा अपमान आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

‘अजितदादांनी आपली विचारधारा बदलली तर आम्हाला काही…’ उदय सामंतांनी थेट सांगितले

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानासंदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांचे हे विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण देशभरात श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती अतिशय श्रद्धेने साजरी केली जाते. प्रभू श्रीराम आणि भगवान हनुमानाप्रती सर्वांच्या मनात अपार श्रद्धा आहेत. दंगलींसाठी ती साजरी केली जाते, असे म्हणणे हा समस्त समाजाचा आणि रामभक्तांचा अपमान आहे. भविष्यात दंगली होतील, असे विधान करणे म्हणजे तुम्ही दंगली घडायच्या ठरवले आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. नेत्यांनी अतिशय संयमाने वागले पाहिजे. प्रत्येक वेळी सनसनाटी निर्माण करणे योग्य नाही.

Exit mobile version