ऐन दिवाळीत भाविकांचा भीषण अपघात नंदुरबारमध्ये पीकअप दरीत कोसळलं, 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी

Nandurbar accident चांदशैली घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले

Accident 2

Accident 2

Devotees terrible accident during Diwali, pickup falls in valley in Nandurbar, 6 dead, 15 seriously injured : ऐन दिवाळीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरामध्ये खळबळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

दुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटातमधून भगवान अस्तंबा ऋषी यात्रेसाठी पीकअपद्वारे काही भाविक चालले होते. त्यावेळी घाटात आल्यानंतर त्यांची ही पीकअप खोल दरीमध्ये कोसळली आहे. या भीषण अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.सर्व जखमींना तात्काळ तळोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Afghanistan Cricketers : पाकिस्तानी हवाई हल्ल्यात ठार झालेले तीन अफगाण क्रिकेटपटू कोण?

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. दिवाळीच्या दिवशीच यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पुण्यातील जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात…

पुण्यातील जुन्या कात्रज घाटात मंगळवारी भीषण अपघात झाला होता. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर पीएमटी बसचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी सुमारे 8:40 वाजता जुन्या कात्रज घाटामध्ये भिलारेवाडी वळणाजवळ पीएमटी बस (क्र. MH14/HU/6432) आणि हिरो होंडा पॅशन मोटरसायकल (क्र. MH12/FB/0348) यांचा भीषण अपघात झाला.

Dhanteras : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्टची खास सेवा; धनतेरसला घरबसल्या खरेदी करा सोने-चांदी

या अपघातात मोटरसायकलवरील आकाश रामदास गोगावले ( वय ,29, रा. ससेवाडी, भोर) आणि अनुष्का प्रकाश वाडकर ( वय, 27) यांचा जागीच मृत्यू झाला असून नेहा कैलास गोगावले (वय, 20) ही गंभीर जखमी झाली आहे. जखमीवर भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर पीएमटी बसचालक सुधीर दिलीप कोंडे ( 42, रा. आर्वी, पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

Exit mobile version