Download App

‘त्यादिवशी आरोपीचे अन् एपीआयचे बिल मीचं दिलं…’; 50 दिवसांनी धनंजय देशमुखांचा खुलासा

Dhananjay Deshmukh : चहा पिऊन झाल्यावर त्यांचं बिल मी दिलं. जर मला कल्पना असती तर मी पोलिसांकडे गेलो असतो. - धनंजय देशमुख

  • Written By: Last Updated:

Dhananjay Deshmukh : सरपंसंतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची ९ डिसेंबरला अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. दरम्यान, या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला (Walmik Karad) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. तर कृष्णा आंधळे (Krushna Andhale) याला वॉन्टेड घोषित करण्यात आलं. या संपूर्ण प्रकऱणाननंतर दररोज नवनवीन पुरावे तपास यंत्रणांना मिळत असून काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सीसीटीव्हीबद्दल धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी भाष्य केलं.

मध्यमवर्गीयांना मिळणार दिलासा, कर प्रणालीमध्ये मोदी सरकार करणार मोठा बदल? 

सीसीटीव्हीबाबत काय म्हणाले धनंजय देशमुख?
काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सीसीटीव्हीबद्दल बोलतांना धनंजय देशमुख म्हणाले की, केजमध्ये एक एक ठिकाण आहे, तिथं सगळेच जण भेटतात. त्याच ठिकाणी मी माझ्या मित्रांसोबत चहापानासाठी बसलो होतो. तेव्हा त्या ठिकाणी आरोपी आणि एपीआय आले. मला त्यांनी बोलावून घेतलं. माझी आणि आरोपीची चर्चा त्या ठिकाणी झाली नाही. चहा पिऊन झाल्यावर त्यांचं बिल मी दिलं. जर मला कल्पना असती तर मी पोलिसांकडे गेलो असतो, असं ते म्हणाले.

पुढं त्यांनी सांगितलं की, चहा पिऊन झाल्यावर त्यांचं बिल मी दिलं. जर मला कल्पना असती तर मी पोलिसांकडे गेलो असतो. आरोपींनी त्यांचे टार्गेट पूर्ण केलं. आपण मात्र चांगुलपणा केला होता. आरोपींनी घात केला. माझ्याकडे येणाऱ्या लोकांसाठी अतिथी देवो भवचा बोर्ड लावला आहे. कुणीतरी बाहेरचं असलं तरी त्याला पाहूनचारण करणं आपलं काम आहे, या भावनेतून मी साहेबांसाठी बिल दिलं, असं देशमुख म्हणाले.

दहावी, बारावीच्या परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको; मंत्री नितेश राणेंचं शिक्षणमंत्र्यांना पत्र 

जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करा…
दरम्यान, धनंजय देशमुख यांनी एक दिवसाचे उपोषण करून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी ते म्हणाले की, देशमुख म्हणाले की, मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडत चालली आहे. त्यांना बळ द्यावा. मी सरकारला विनंती करतो की त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा. सरकारने गांभीर्यापूर्वक याची दखल घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले.

तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस उलटले असून कुटुंबाचे दुःख, वेदना अजूनही कायम आहे. मात्र पोलिस त्यांचा तपासकाम मार्गी लावत असून त्यांनी तपास यंत्रणेवर समाधान व्यक्त केले आहे.

मला टार्गेट केलं जातंय – धनंजय मुंडे
धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य केलं. मुंडे म्हणाले की, जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना मी दोषी वाटत असेल तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. जर माझ्या राजीनाम्याने सगळ्या गोष्टी सुटणार असतील तर राजीनामा देईल. माझ्या वरिष्ठांनी मला माझा दोष सांगावा. माझी नैतिकता जनतेप्रती प्रामाणिक आहे आणि मी आतापर्यंत प्रामाणिक भूमिका मांडली आहे. या प्रकरणात अजूनही मला टार्गेट केलं जातंय, असं ते म्हणाले.

follow us