दहावी, बारावीच्या परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको; मंत्री नितेश राणेंचं शिक्षणमंत्र्यांना पत्र

इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात यावा. - नितेश राणे

  • Written By: Published:
Nitesh Rane

Nitesh Rane : सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणारे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा मुस्लिम विद्यार्थ्यांसंदर्भात राज्य सरकारकडे (state government) वेगळीच मागणी केली. इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षार्थींना बुरखा (Burakha) घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात यावा, अशी मागणी राणे यांनी केली आहे. त्यांनी याबद्दलचे एक पत्र शिक्षणमंत्री दादा भुसेंना (Dada Bhuse) लिहिले आहे.

गर्भवती महिलांसाठी गुडन्यूज! लसीकरणासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट…’ही’ खास सेवा सुरू 

बारावीच्या परीक्षा येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षांचं वेळापत्रक, हॉल तिकीट आणि परीक्षा केंद्रासह सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अशातच राणेंनी ही मागणी केली. त्यांनी या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र लिहिले.

राणेंनी लिहिलेल्या पत्रात काय?
राणेंना आपल्या पत्रात लिहिलं की, इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेस परीक्षार्थींनी बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी तसेच परीक्षेच्या वेळी आवश्यकता वाटल्यास तपासणीसाठी महिला पोलिस अधिकारी किंवा शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक करावी, असे शासन स्तरावरून कळण्यात आले आहे.

पुढं त्यांनी लिहिलं की, इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या परीक्षा आहेत. यावर विद्यार्थ्यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. सदर परीक्षा ही पारदर्शकपणे आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जसे कॉपीमुक्त परीक्षा होणे अपेक्षित आहे. यासाठी शासन स्तरावरून वेळोवेळी सूचना जारी केल्या जातात. जर परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला तर एखादा परीक्षार्थी बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा उपयोग करून परीक्षा देत आहे किंवा नाही, हे तपासणे शक्य होत नाही. आकस्मिक प्रसंगी काही आक्षेप उद्धभवल्यास सामाजिक तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना  नुकसान सहन करावे लागेल.

राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थांना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्याकरिता तातडीने कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, अशी विनंती राणे यांनी पत्राद्वारे केली. त्यांनी हे पत्र शिक्षणमंत्री दादा भुसे यांना लिहिले आहे.

 

follow us