Download App

धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिले तर अजितदादांचा पक्ष संपेल; जरांगे पाटांलाचा इशारा

Manoj Jarange Patil On Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पुन्हा

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil On Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मंत्रिपदाबाबत धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे जर धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले तर अजितदादांचा पूर्ण पक्ष संपेल अशा इशारा मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

मनोज जरांगे पाटील आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणासाठी सक्रिय होऊन आमच्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे, अन्यथा समाज त्यांना उत्तर देईल असं माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले.

तर धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरु असल्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ते स्वप्नातही आणू नका. मंत्रिपदाचे सोपे नाही. अजितदादांचा पूर्ण पक्षच संपेल. इतकी क्रूर हत्या घडवून आणणारे, इतके गुंड सांभाळणारे, पुन्हा मंत्री केले तर पक्ष संपेल ना, ते बंगल्यात राहिले काय आणि नाही काय, मला देणेघेणे नाही. यापुढे सांगतो की, कितीही मंत्री होऊ दे, आमचे ते दु:ख नाही. ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय देणे काम आहे. तुम्ही दोन काय चार मंत्री व्हा. आम्हाला फरक पडत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.

अजितदादांकडे पालकमंत्रिपद मात्र तरीही देखील गुन्हेगारी सुरुच

तर दुसरीकडे बीडमध्ये गुन्हेगारी वाढण्यास तेथील राजकीय शक्तीच कारणीभूत असून प्रशासनही तितकेच यामध्ये गुंतले आहे असा दावा देखील यावेळी जरांगे पाटील यांनी केला. तर अजितदादांकडे पालकमंत्रिपद आहे मात्र तरीही देखील गुन्हेगारी सुरुच आहे. यावरुन प्रशासनावर वचक नाही, हे सिद्ध होते. अशी टीका देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

काँग्रेसचरणी लीन झालेल्या… उबाठाला माफ करा! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शिंदेंच्या शिवसेनेचे हटके आंदोलन

follow us