Dhananjay Munde : अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सेवा देण्याचे अत्यंत महत्वाचे काम आहे. प्रामाणिकता, पारदर्शकता आणि अकाउंटिबीलिटी या त्रिसूत्रीचा अवलंब करून विभागात चांगले करावे, सर्व सामान्य नागरिकांच्या रोजच्या जगन्याशी या विभागाचा संबंध आहे त्यामुळे अधिक पारदर्शकपणे आणि जास्त जबाबदारीने काम करावे अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिल्या.
तसेच स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्था याला प्राथमिकता देणार असल्याचेही धनंजय मुंडेंनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज मंत्री मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचा सविस्तर आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.
शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करत असताना विभागाचे डीजीटायजेशन , आधुनिक गोदाम व्यवस्था याचा अंतर्भाव करण्याच्या सूचना देऊन मंत्री मुंडे म्हणाले की, विभागाच्या कामकाजामध्ये आणखी सुधारणा करावी, धान्य खरेदी ते धान्य वितरण या प्रत्येक टप्प्यावर त्याची अपडेटेड माहिती घेणारी यंत्रणा निर्माण करावी. धान्याचे वितरण जलद होण्यासाठी एक गाव एक गोदाम ही योजना तातडीने कार्यान्वित करावी, स्मार्ट गोदाम उभारण्यात यावीत, वितरण व्यवस्था सुधारल्यामुळे होणारे नुकसान कमी होऊन ग्राहकांचा आणि लाभार्थ्यांना फायदा होईल, लाभार्थ्यांना स्मार्ट शिधा पत्रिका वितरण करण्याची कार्यवाही सुरू करावी, धान्य खरेदी ही विकेंद्रित करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा तसेच जास्तीत जास्त गोदामांची उभारणी करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
आरोपींना फाशी द्या, प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
मंत्री मुंडे पुढे म्हणाले की, ग्राहक संरक्षण आणि धान्य वितरण यासाठी डिजिटल डॅश बोर्ड विकसित करावा, ग्राहक संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी त्यामध्ये शाळा, महाविद्यालय यांना सहभागी करून घ्यावे, लाभार्थ्यांना सुलभ आणि त्वरित तक्रार निवारण होईल अशा प्रकारची यंत्रणा निर्माण करावी. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सहसचिव रामचंद्र धनावडे, उपसचिव राजश्री सारंग, संतोष गायकवाड यांच्यासह, विभागाचे अवर सचिव व अधिकारी उपस्थित होते.