Download App

अखेर धनंजय मुंडेंनी केलं स्पष्ट, म्हणाले… वाल्मिक कराड माझ्या जवळचे

  • Written By: Last Updated:

Santosh Deshmukh Murder Allegations On Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जातोय. ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. असं म्हणत विरोधक धनंजय मुंडेवर तुटून पडलेत. आता या प्रकरणी स्वत: धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

बीड प्रकरणात होत असलेल्या आरोपांवर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की,  देशमुखांची ज्यांनी कोणी निर्घृण हत्या (Maharashtra Politics) केली, त्यांना शासन झालं पाहिजे. या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे. शेवटी तोही माझ्याच जिल्ह्यातील एक सरपंच आहे. मलाही त्याच्याबद्दल तेवढाच आदर आहे. आता यात जे कोण गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग तो कोणीही असो. अगदी माझ्याही कोणी जवळचा असेल तर त्याला सोडायचं नाही. याप्रकरणी केवळ राजकारणापोटी माझ्यावर आरोप केले जात आहेत. असं धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले (Valmik Karad) आहेत.

भाजपला यंदा मिळाली तिप्पट देणगी; काँग्रेसपेक्षा छोट्या राज्यातील पक्षाची मोठी बाजी !

वाल्मिक कराड यांची जवळीक सुरेश धसांसोबत होती. माझ्या जवळचे तर ते आहेतच. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करत आहेत. ती चौकशी देखील अतिशय पारदर्शकपणे व्हावी, असं देखील धनंजय मुंडे आज म्हणालेत. शासन कोणालाही पाठीशी घालत नाही. अजितदादांना सगळी वस्तुस्थिती सांगितली आहे. या प्रकरणात कोणीही असेल तर त्याला सोडायचं नाही, अशी भूमिका माझी आहे. मिडिया ट्रायल करून मला समाजकारण आणि राजकारणातून उठवायचं अशी विरोधकांचा हेतू असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय.

धनंजय मुंडे म्हणाले की, मी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच विभागाची बैठक घेतली होती. या बैठकीत येणाऱ्या पाच वर्षामध्ये फार वेगाने आणि अतिशय चांगलं काम उभं करावं लागणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा हे विभाग फार महत्वाची सेवा देणारे विभाग आहेत. कोण वेगवेगळ्या पद्धतीने काही मान्य करत असेल. ही सेवा अतिशय चांगल्या प्रकारे शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत जर आपण पोहोचवली, तर त्याच्यासारखं पुण्य दुसरं कोणतंच नाही, असं समजणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे, असं देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज; कल्याण प्रकरणानंतर चित्रा वाघ संतापल्या…

मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. कामामध्ये पारदर्शकता आणून शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत आपण राशनचा लाभ देत आहोत, तो लाभ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. ते पोहोचवत असताना सुद्धा विभागाच्या सुविधांवर देखील तेवढ्याच तत्परतेने काम करणं गरजेचं आहे. आज हे राशन पोहोचवण्यासाठी लागणारा अवास्तव खर्च कमी करून शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवला जाईल, यावर आज पार पडलेल्या पहिल्याच बैठकीत चर्चा झालीय. सर्वच विभाग मुख्यमंत्र्यांना शंभर दिवसाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यासंदर्भात देखील मी आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत.

 

follow us