हे असले बॉस? धनंजय मुंडेंचा ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत अंजली दमानियांनी डागली तोफ
Anjali Damani On Dhananjay Munde : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damani) यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स वर पोस्ट करून म्हटलं आहे की, हे असले बॉस ? इन्स्टाग्रामवर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार ? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का ? ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तर आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड (Valmik Karad) पोलिसांशी चर्चा करत असल्याचं दिसत आहे. हे पोलिस आहेत का ह्या वाल्मिक कराडांचे नोकर? असा प्रश्न देखील त्यांनी एक्सवर विचारला आहे.
हे असले बॉस ?
इनेटाग्राम वर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार ?
कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते.
आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का ?
ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज… pic.twitter.com/bQGa71D79D
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 26, 2024
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे तर तीन आरोपी फरार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊ नये अशी मागणी देखील भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
मेलबर्नच्या मैदानावर तुफान गर्दी, रेकॉर्ड मोडला, पहिल्या दिवशी ‘इतक्या’ प्रेक्षकांनी लावली हजेरी