Download App

मी राजीनामा का द्यावा? संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबत माझा कोणताही संबंध नाही; धनंजय मुंडे

Dhananjay Munde Reaction On Resignation : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जातंय. सोबतच आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होतेय. विरोधकांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उचलून धरली (Santosh Deshmukh Murder Case) आहे. यावर आता धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केल्याचं समोर आलंय. सोबतच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केलीय.

एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट (Beed News) दिलंय. त्या खाटा हे प्रकरण घडण्यापूर्वीच मागवल्या होत्या. हे प्रकरण घडण्यापूर्वी किंवा घडल्यानंतर मागवण्यात आलेल्या नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी होतेय. यावर धनंजय मुंडे म्हणाले की, मी राजीनामा द्यावा तर का द्यावा? याचं काहीतरी ठोस कारण लागेल. कोणत्याही प्रकरणात मी आरोपी नाही. माझा या प्रकरणाशी अर्थाअर्थी संबंध नाही. आता या प्रकरणात आवोचा बावो करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा, अशा पद्धतीने माझा राजीनामा काहीजण मागत आहेत. त्यांचं मागण्यातच समाधन आहे. खूप आहे.

संतोष देशमुख हत्येचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा; संजय राऊतांची मागणी

विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, विजय वडेट्टीवार बोलायला फार हुशार आहेत. एकतर छोटा आका किंवा मोठा आका असं कोणी नाहीये. पोलीस प्रशासन आणि सीआयडी तपास करत (Dhananjay Munde Reaction On Resignation) आहे. दिवंगत संतोष देशमुख यांची जी हत्या झालीय, हत्या ज्यांनी कोणी केलीय. त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेवून फासावर चढवणं हा पहिला उद्देश आमचा आहे. त्यामुळं त्यामुळं कोणी काय बोलावं याला काही अर्थ नाही. मुळात या प्रकरणात हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये न्यावी अशी मागणी मी हिवाळी अधिवेशनात केली होती, असं मुंडे म्हणाले आहेत.

मोठी बातमी : सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत होणार; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली नसल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत. हा तपास न्यायालयीन देखील होणार आहे. एका निर्घृण हत्येमुळे सर्वपक्षीय आमदारांनी एकवटले आहेत. बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत आमचे नेते आदरणीय अजितदादा निर्णय घेतील, असं देखील धनंजय मुंडे म्हणालेत. काही शासकीय कामांच्या संदर्भात मी आज बावनकुळे साहेबांची भेट घेतली. महसूल विभागाचे बीड जिल्ह्यातले आणि परळी मतदारसंघाचे काही प्रश्न राहिले होते, ते मार्गी लावण्यासाठी आज भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबत माझा कोणताही संबंध नाही, असं देखील धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय.

 

follow us