Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड तर काहीच नाही, यांची क्राईम हिस्ट्री बघा!

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड तर काहीच नाही, यांची क्राईम हिस्ट्री बघा!

Santosh Deshmukh Murder Case : बहुचर्चित सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आत्तापर्यंत काही संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पुढं आलीयं. देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) असल्याचा आरोप सातत्याने केला जातोयं. विरोधकांनी हा मुद्दा थेट हिवाळी अधिवेशनात लावून धरल्याने अखेर वाल्मिक कराडच्या मालमत्ता सील करण्याचे आदेशही देण्यात आले. अखेर अनेक दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड काल पुण्यात सीआयडीसमोर शरण आलायं. सध्या या प्रकरणी त्याची चौकशी सुरु आहे, पण या प्रकरणात इतर आरोपींची वाल्मिक कराडपेक्षाही खतरनाक क्राईम हिस्ट्री असल्याचं समोर आलंय. या प्रकरणात कोण-कोणते आरोपी आहेत, आणि त्यांची क्राईम हिस्ट्री नेमकी काय हे आपण जाणून घेऊयात…

केजरीवालांचा माइंडगेम! संघप्रमुख भागवतांना लिहीलं पत्र; विचारले भाजपविरोधी 4 सवाल

संतोष देशमुख यांचं आधी अपहरण नंतर अमानुषपणे मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोयं. यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर बीड जिल्ह्यात जंगलराज सुरु आहे, त्यामुळे बीडचं पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्विकारावं अशी मागणी केलीयं. त्यामुळे आता या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लक्ष घालून आरोपींच्या अटकेसाठी पोलिस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. विरोधकांकडून मुख्य सुत्रधार हा वाल्मिक कराड असून त्याला तत्काळ अटक करुन त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होता. त्यानंतर अखेर वाल्मिक कराड काल सीआयडीसमोर शरण आलायं. मात्र, वाल्मिक कराड वगळता इतरही अनेक सराईत गुन्हेगारांचा संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंध असल्याचं सांगितलं जातंय. यामध्ये सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे यांच्यावर गुन्हा दाखल झालांय.

Jaipur Gas Leakage : मोठी बातमी! जयपूरमध्ये गॅस गळती, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच 26 वर्षे वय असून त्याच्यावर मागील 10 वर्षांत 10 गुन्हे दाखल आहेत. या 10 गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे केज पोलिस ठाण्यात नोंद आहेत. यामध्ये मारहाण, चोरी, अपहरण, खंडणी, खूनाचा प्रयत्न आणि फूस लावून पळवण्याचे गुन्हे सुदर्शन घुलेवर दाखल आहेत. तर दुसरा आरोपी कृष्णा आंधळे. याचं वय 27 असून त्याच्यावर मागील 4 वर्षात 6 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, गर्दी मारहाण, आणि खंडणीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तर महेश केदार याचं 21 वर्ष वय असून त्याच्यावरही खुनाच्या प्रयत्नासह चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चौथा आरोपी प्रतिक घुले. याचं वय 24 वर्ष असून मागील 7 वर्षांत त्याच्यावर खुनात सहभाग, मारहाण, दुखापत करणे असे एकूण 5 गुन्हे दाखल झाले आहेत.

तर पाचवा आरोपी सुधीर सांगळे याचं अवघं 22 वर्ष वय असून आवादा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. यासोबतच खुनाच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलायं. तसेच राष्ट्रवादीचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यावर 2 गुन्हे दाखल असून आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याचे हे दोन गुन्हे चाटे याच्यावर दाखल आहेत. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.

दरम्यान, बीडमध्ये खुलेआमपणे पिस्तुलातून गोळीबार करण्याच्या घटना, अपहरण, खुनाच्या घटना सातत्याने घडत असल्याने बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून केला जात आहे. या संपूर्ण घडामोडींनंतर भाजपचे आमदार सुरेश धस जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. तर दुसरीकडे वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी सुनावण्यात आली असून या चौकशीतून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube