वाल्मिक कराड पांढऱ्या स्कॉर्पिओतून आला… ‘ती’ गाडी नेमकी कोणाची? वाचा A टू Z माहिती
Walmik Karad Surrender In CID Office Pune : बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) निकटवर्तीय वाल्मिक कराडचं (Walmik Karad) नाव जोडलं जातंय. मागील 22 दिवसांपासून तो फरार होता. पोलीस आणि सीआयडी ज्याचा शोध घेत होते, तो वाल्मिक कराड अखेर आता शरण आलाय. पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलंय. त्याला सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं असून याप्रकरणी कसून कारवाई केली जातेय. त्यामुळे इतके दिवस फरार असलेला वाल्मिक कराड कुठे लपून बसला होता? या सगळ्याचा तपास आता पोलीस करत आहेत.
वाल्मिक कराड शरण; CIDच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली महत्वाची माहिती, पुढील चौकशी…
अनेक दिवसांपासून पोलीस आणि सीआयडी (CID Office) या प्रकरणाच्या तपासात गुंतलेले होते. मस्साजोगच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप आहेत. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. पोलिसांची पथकं, सीआयडीची पथकं सगळीकडे कराडचा शोध घेत होते. आज सकाळच्या सुमारास वाल्मिक कराड हा आज पुण्यातीला पाषाण रोडच्या मुख्यालयात दाखल झाला. तिथे त्याने सरेंडर केलंय. हे सरेंडर करण्याआधी त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झालाय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जावी, असं देखील कराडने म्हटलंय.
मागील काही दिवसांपासून पोलीस आणि सीआयडीची पथकं कराडचा शोध घेत होते. परंतु तो काही हाती लागत नव्हता. अखेर आज पांढऱ्या रंगाच्या गाडीतून वाल्मिक कराड हा सीआयडीच्या ऑफिसमध्ये दाखल झाला होता. ही गाडी बीडची असल्याचं सांगितलं जातंय. त्या गाडीबद्दल आपण जाणून घेऊ या. ही पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आहे. तिचा क्रमांक MH23BG2231 आहे. ही स्कॉर्पिओ सीआयडीच्या कार्यालयात दाखल झाली होती. त्या गाडीतून वाल्मिक कराड उतरला. ही गाडी शिवलिंग मोराळे नावाच्या व्यक्तीची आहे. मोराळे देखील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातोय.
वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यात… CID ला कसं कळालं नाही? छत्रपती संभाजीराजेंचे गंभीर आरोप
शिवलिंग बीडमधील शासकीय कामांचे कंत्राट घेत असतो. ही गाडी ती अजित शिवलिंग मोराळे याच्या नावावर आहे. तो शिवलिंग मोराळे यांचा मुलगा आहे. एका गाडीतून वाल्मिक कराड याच गाडीतून सीआयडी ऑफिसला आलेला आहे. आता या प्रकरणात शिवलिंग मुराळे याचा देखील सीआयडी तपास करणार का? आतापर्यंत मुराळे कुठे लपून बसला होता, याची देखील माहिती सीआयडी घेणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
याप्रकरणी आता सीआयडीच्या पोलीस महानिरीक्षकांची देखील प्रतिक्रिया समोर आलीय. जुजबी चौकशी करून कराडला बीडला पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता या वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंध आहे का? तसेच या प्रकरणात आणखी कोणाचं नाव समोर येतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे.