वाल्मिक कराड शरण; CIDच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली महत्वाची माहिती, पुढील चौकशी…

वाल्मिक कराड शरण; CIDच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली महत्वाची माहिती, पुढील चौकशी…

CID Officer Reaction After Walmik Karad Surrender : बीड (Beed) जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणीच्या गुन्ह्यात वाँटेड असलेला वाल्मिक कराड याने आज पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलंय. कराड राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. पोलिसांकडे जाण्यापूर्वी कराड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटलं होतं. कराडने (Walmik Karad) सरेंडर केल्यानंतर आता सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक सारंग आव्हाड ( CID Officer Sarang Awhad) यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

सीआयडीचे पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी माध्यमांना माहिती दिली की, आज 31 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील केज पोलीस स्टेशन 638/2024 या गुन्ह्यातील फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वत:हून सीआयडी मुख्यालय येथे हजर झालेला आहे. त्याला सीआयडी पुणे यांनी ताब्यात घेतलेलं आहे. थोडीफार जुजबी चौकशी करून नंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह बीडचे तपासी अंमलदार अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेलं आहे.

Kiribati : बाय बाय 2024! फटाक्यांची आतिषबाजी अन् एकच जल्लोष; ‘या’ देशात नव्या वर्षाला सुरुवात…

पुढील कारवाई काय असेल, यावर बोलताना सारंग आव्हाड म्हणाले की पुढे सीआयडीचे डीवायएसपी जे आहेत, त्यांच्या ताब्यात संबंधित फरार आरोपीला देण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, आज वाल्मिक कराड त्याच्या साथीदारांसह पुण्यातील पाषाण भागात असलेल्या सीआयडी कार्यालयात कारने पोहोचला होता. त्यानंतर त्याने आत्मसमर्पण केले. सीआयडीची टीम तयार करण्यात आली होती, जी महाराष्ट्रासह कर्नाटकातही कराडचा शोध घेत होती.

शेवटी, पोटासाठी काहीपण, 14 वर्षांचा अनुभव असलेला ग्राफिक डिझायनर बनला रिक्षाचालक!

वाल्मिक कराडने आत्मसमर्पण करण्यापूर्वी व्हिडीओ जारी करून आपली बाजू मांडली. मी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात माझ्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यात पुण्यातील सीआयडी अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करतोय, असं वाल्मिक कराड म्हणाला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असलेल्यांना शिक्षा होऊन फाशी झाली (Santosh Deshmukh Murder Case) पाहिजे. राजकीय सूडबुद्धीने माझं नाव या प्रकरणात घेण्यात येत आहे. या प्रकरणात मी दोषी असेल तर मला शिक्षा झाली पाहिजे, असं देखील वाल्मिक कराड म्हणाला आहे.

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या झाली. बीड जिल्ह्यातील पवन ऊर्जा कंपनीकडून काही लोकांकडून पैसे उकळण्याच्या प्रयत्नाला विरोध केल्यामुळे सरपंचाची हत्या करण्यात आल्याचं बोललं जातंय. याप्रकरणी चार जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पण वाल्मिक कराड हा फरार होता. अखेर त्याने आज आत्मसमर्पण केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube