वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यात… CID ला कसं कळालं नाही? छत्रपती संभाजीराजेंचे गंभीर आरोप
Chhatrapati Sambhaji Raje Reaction After Walmik Karad Surrender : बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडने (Walmik Karad) पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलंय. बीडचे स Santosh Deshmukh रपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराडवर आरोप केले जात आहेत. वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी सरकारवर दबाव होता. वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळं या प्रकरणात राजकीय नेत्यांकडून देखील आरोप केले जात आहेत. दरम्यान आज वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर आता छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे.
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यातील स्वराज्य भवनातून संबोधन केलंय. 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये आक्रोश मोर्चा झाला. सामान्य जनतेच्या आक्रोशाची दखल सरकारने घ्यावी, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आज सकाळी वाल्मिक कराड सीआयडीसमोर समर्पित झालाय. अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. हे सीआयडीचं यश नसून मानसिक दबावामुळे सरेंडरचा विचार कराडने केला असेल. 22 दिवस आरोपी बिनधास्तपणे फिरतो, अक्कलकोटला जावून दर्शन घेतो. पुण्याच्या दवाखान्यात उपचार घेतो हे सीआयडीला कसं कळालं नाही, असा सवाल संभाजी राजेंनी विचारला आहे.
कालच धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात, अन् बरोबर आज निर्णय होतो. यामागे काही लपलंय का? हा संशोधनाचा भाग आहे. सात आरोपींचा हा मोरक्या आहे. त्याच्या नावाने चौदा गुन्हे होते. तरी दोन दोन बॉडीगार्ड घेवून फिरतो. यात काहीतरी गडबळ घोटाळा आहे. या प्रकरणात हवी तशी कारवाई होत नाही. नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात अटक होवून चालणार नाही, तर मोक्का लावणं गरजेचं आहे. याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी सांगावं असं संभाजी राजे म्हणाले आहेत.
अजितदादा पवार तुम्ही देखील या विषयावर एकदाही बोलला नाही, तुम्ही धनंजय मुंडेंना संरक्षण का देता? असा सवाल संभाजीराजेंनी केलाय. तीन दिवस कराड पुण्यात कसा राहिला, तर मग डिपार्टमेंटला कसं समजलं नाही, असं देखील त्यांनी विचारला. हा सरळ असता तर दुसऱ्या दिवशीच सरेंडर झाला असता, सगळे बॅंक खाते सीझ झाल्यानंतर सरेंडर व्हायचं. त्यामुळं कराड या हत्येप्रकरणाशी तितकाच कनेक्ट असल्याचं देखील संभाजीराजे म्हणालेत.
आधी व्हिडीओ बनवला, मग शरण गेला… वाल्मिक कराडच्या सरेंडरची स्टोरी
नक्कीच हा काहीतरी प्लॅन आहे. सरेंडरला 22 दिवस का लावले? धनंजय मु्ंडेंकडून कराडला काही निरोप आलाय का? असा सवाल देखील संभाजीराजेंनी केला. बीडचे पालकमंत्री कोणीही होवू नये, फक्त धनंजय मुंडेंनी ते स्वीकारून चालणार नाही. संतोष देशमुखला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी मंत्रिपद स्वीकारणार नाही, असं धनंजय मुडेंनी म्हणायला हवं होतं. येथे कोणत्याही जातीचा, धर्माचा विषय नाही. काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. माणुसकीची हत्या केलेली आहे.
वाल्मिक कराडचे आश्रयदाते धनंजय मुंडे आहेत, ते देखील स्वत: मान्य करतात. त्यांचे कनेक्शन आहेत, हे सगळं ओपन व्हायचं असेल तर वाल्मिक कराडला मोक्का लावायला पाहिजे, अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केलाय.