Santosh Deshmukh : रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली, रडत रडत म्हणाली…

  • Written By: Published:
Santosh Deshmukh : रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली, रडत रडत म्हणाली…

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापलं असून जवळ जवळ सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. (Santosh Deshmukh) आता या घटनेविरोधात लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रेणापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक या आक्रोश मोर्चात सहभागी झाले आहेत. रेणापूर येथील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असे या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

रेणापूरच्या तहसीलदारांना निवेदन

माझ्या वडिलांच्या हत्येच्या घटनेत जे लोक आहेत त्या सर्व दोषींना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी मृत सरपंच संतोष देशमुख यांची लहान कन्या वैभवी संतोष देशमुख हीने केली आहे. वैभवी देशमुख यावेळी बोलताना भावनिक झाली असून न्याय मिळेपर्यंत हा लढा लढत राहणार असल्याची प्रतिक्रिया तीने दिली आहे. या मोर्च्याच्या मार्फत रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना निवेदन देण्यात आला आहे. यात मुख्यत्वे सात मागण्या करण्यात आल्या आहेत.

सपना चौधरी, रश्मिका मंदाना अन् प्राजक्ता माळी; सुरेश धस यांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

संतोष देशमुख हत्याप्रकरणात सरकारने ठोस पाऊल नाही उचलली तर एक जानेवारीला रेणापूर येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार. तसेच या प्रकरणाचा निकाल लागपर्यंत मुंडे बहीण भावाने मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही या मोर्च्यातून करण्यात आली आहे. दोषींना तात्काळ शिक्षा करण्यात यावी, जे लोक फरार आहेत त्यांना अटक करण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा. इत्यादि मागण्यांसाठी आज लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.

स्टेशनमध्ये चौकशी

दुसरीकडे संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आसून हत्याप्रकरणातील आरोपीची सीआयडी कडून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. विष्णू चाटे यांची सीआयडीचे महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये तळ ठोकून आहेत. बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडेसह सीआयडी ॲक्शन मोड वर काम करत असताना पाहायला मिळत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube