सपना चौधरी, रश्मिका मंदाना अन् प्राजक्ता माळी… सुरेश धस यांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Suresh Dhas On Dhananjay Munde: बीड येथील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणारे भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि जिल्ह्यात सुरु असलेल्या गोरख धंद्याला चाप बसवावा या मागणीसाठी आमदार सुरेश धस यांनी बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत (Navneet Kanwat) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर हल्लाबोल केला.
माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस यांनी परळी राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले आहे. परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदेशीर ताबा असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. या धंद्यांच्या जोरावर प्रचंड पैसा मिळवला जात आणि त्यातूनच इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी (Sapna Chaudhary) , रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) , प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांना इथे आणले जाते. असं आमदार सुरेश धस माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच जर कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे आणि याचा प्रसार देशभरात करावा असेही यावेळी आमदार धस म्हणाले.
पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल असं धस म्हणाले. तसेच प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रिटी परळीत येत असतात असं देखील आमदार सुरेश धस म्हणाले.
Aus Vs Ind : बॉक्सिंग डे कसोटी दुसऱ्या दिवशी भारताची पीछेहाट अन् फॉलोऑनचे संकट
तर दुसरीकडे केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. तर तीन आरोप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या प्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक महायुती सरकारवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे.