Aus Vs Ind : बॉक्सिंग डे कसोटी दुसऱ्या दिवशी भारताची पीछेहाट अन् फॉलोऑनचे संकट

Aus Vs Ind : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असणाऱ्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी करत भारतीय संघाला मोठा धक्का दिला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळसंपे पर्यंत भारतीय संघाने पहिल्या डावात 5 विकेट गमावून 164 धावा केल्या आहेत.
भारतीय संघ आता देखील ऑस्ट्रेलियाशी 310 धावांनी मागे आहे. तर भारतीय संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 111 धावांची गरज आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातील ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि उपकर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला चारशे पार नेले. स्टीव्ह स्मिथने या मालिकेत दुसरा आणि त्याच्या कारकिर्दीतील 34 वे शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या.
तर दुसरीकडे या सामन्यात भारतीय कर्णधार सलामीवीर म्हणून आला आणि अपयशी ठरला. त्याला 3 धावा करता आल्या. या मालिकेत रोहित आतापर्यंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. तर यशस्वी जैस्वालने दमदार अर्धशतक पूर्ण केले, मात्र तो धावबाद झाला आणि त्यानंतर विरोट कोहली देखील बाद झाला. भारताची दिवसातील शेवटची विकेट आकाश दीपच्या रूपाने पडली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताची धावसंख्या 164 /5 अशी आहे.
Stumps on Day 2 in Melbourne!#TeamIndia move to 164/5, trail by 310 runs
Updates ▶️ https://t.co/njfhCncRdL#AUSvIND pic.twitter.com/9ZADNv5SZf
— BCCI (@BCCI) December 27, 2024
पारनेरमध्ये मस्साजोगची पुनरावृत्ती…अपहरण करून बेदम मारहाण , पाच जणांविरोधात गुन्हा
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ करत आपल्या धावसंख्यात 140 हून अधिक धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने 140 धावा केल्या, तर सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅबुशेन यांनी अर्धशतकांसह 474 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने 49 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने भारतासाठी 4 विकेट घेतल्या.