Alex Carey ने रचला इतिहास, नावावर नोंदवला ‘हा’ खास विक्रम, काय ते वाचा

  • Written By: Published:
Alex Carey ने रचला इतिहास, नावावर नोंदवला ‘हा’ खास विक्रम, काय ते वाचा

AUS vs SL: श्रीलंकेविरुद्ध सुरू असणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (AUS vs SL) ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीने (Alex Carey) इतिहास रचला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या (Australia) पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने 156 धावांची शानदार खेळी केली आणि या खेळीसह तो आता आशियामध्ये 150 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी खेळणारा पहिला ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक बनला आहे.

तर दुसरीकडे शुक्रवारी श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून अ‍ॅलेक्स कॅरी आशियात कसोटी शतक झळकावणारा दुसरा ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ठरला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 91 धावांत तीन विकेट गमावल्यानंतर अ‍ॅलेक्स कॅरी आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) चौथ्या विकेटसाठी 259 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, स्मिथने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 36 वे शतक झळकावले आणि 131 धावांची दमदार खेळी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली आहे. बातमी लिहेपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 132 धावांची आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र पहिल्या डावात श्रीलंकेला फक्त 257 धावा करता आल्या. कुसल मेंडिसने 85 धावांची नाबाद खेळी केली तर मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुहनेमन आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

तर दुसरीकडे स्टीव्ह स्मिथने कसोटीमध्ये शतकांच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथने माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि इंग्लिश फलंदाज जो रूट यांची बरोबरी केली आहे. तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करणारा पाचवा फलंदाजही बनला आहे.

Missing Plane Crash: मोठी बातमी! अलास्कातील बेपत्ता विमान सापडला, सर्व प्रवाशांचा मृत्यू 

कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर 51 शतकांसह अव्वल स्थानावर आहे. जॅक कॅलिस (45) दुसऱ्या, रिकी पॉन्टिंग (41) तिसऱ्या आणि कुमार संगकारा (38 ) चौथ्या स्थानावर आहेत. तर जो रूट, राहुल द्रविड आणि स्टीव्ह स्मिथ प्रत्येकी 36 शतकांसह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube