Missing Plane Crash: मोठी बातमी! अलास्कातील बेपत्ता विमान सापडला, सर्व प्रवाशांचा मृत्यू

Missing Plane Crash: नुकतंच अमेरिकेत विमान अपघात (America Plane Crash) झाल्याने 64 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर आता

  • Written By: Published:
Missing Plane Crash

Missing Plane Crash: नुकतंच अमेरिकेत विमान अपघात (America Plane Crash) झाल्याने 64 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर आता आणखी एक विमान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, या विमान अपघातामध्ये सर्व 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अलास्कातील समुद्रातील बर्फावर विमानाचे अवशेष तुकड्यांमध्ये (Missing Plane Crash in Alaska) आढळले असून बर्फाखाली दबलेल्या मृतदेहांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत.

काल 07 फेब्रुवारी रोजी पश्चिम अलास्कातील उनालाक्लीट येथून या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमान बेपत्ता झाला होता ते नोम शहरात उतरणार होते मात्र मध्येच त्याचा अपघात झाला.

यूडी कोस्ट गार्डचे प्रवक्ते माईक सालेर्नो यांनी अपघात आणि जीवितहानी याची पुष्टी केली. त्याने सांगितले की विमान कोसळले आहे. त्याचे अवशेष सापडले आहेत. मृतदेह शोधण्यासाठी दोन टीम बर्फाळ पाण्यात पाठवण्यात आले आहे. विमानातील सर्व 9 प्रवासी आणि पायलटचा मृत्यू झाला. असं ते म्हणाले.

नोम शहराजवळ संपर्क तुटला

तर दुसरीकडे अलास्का सार्वजनिक सुरक्षा विभागाने सांगितले की, बेरिंग एअर सिंगल-इंजिन टर्बोप्रॉप विमानाने 10 जणांसह उड्डाण केले परंतु अलास्काच्या नोम शहराजवळ दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास विमानाचा संपर्क तुटला. नोमच्या आग्नेयेस 30 मैल (48  किलोमीटर) अंतरावर विमान बेपत्ता झाले. विमान बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्याचा शोध सुरू करण्यात आला.

“आकाच्या गँगचा माज उतरला नाही, आकाच्या आकाची नार्को करा”, सुरेश धस संतापले

शेवटच्या ठिकाणानुसार, नोम किनाऱ्यावरील टोपकोक दरम्यान विमान बेपत्ता झाले होते, म्हणून त्या भागात शोध मोहीम राबवण्यात आली. बेपत्ता होण्यापूर्वी विमान समुद्रापासून 19 किलोमीटर अंतरावर होते. हलका बर्फवृष्टी, धुके होते आणि त्या भागात तापमान उणे 8.3अंश होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या