मोठी बातमी! एअर इंडियासह चार विमानांमध्ये बॉम्ब? एका विमानाची कॅनडामध्ये इमर्जन्सी लँडिंग

  • Written By: Published:
मोठी बातमी! एअर इंडियासह चार विमानांमध्ये बॉम्ब? एका विमानाची कॅनडामध्ये इमर्जन्सी लँडिंग

Air India Plane :  नवी दिल्लीहून शिकागोला जाणारे एअर इंडिया (Air India) विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर एअर इंडियाचे विमानाची कॅनडामध्ये (Canada) इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. तसेच तासाभरात देशातील एकूण चार विमानांना बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमाने जवळच्या विमानतळावर उतरवण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. माहितीनुसार, एअर इंडियाशिवाय स्पाइसजेट, इंडिगो आणि आकासा विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आहे. अशी माहिती एका विमान अधिकाऱ्याने दिली आहे.

तर दुसरीकडे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, 15 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्ली ते शिकागो फ्लाइट क्रमांक AI-127 हे ऑनलाइन पोस्ट केलेल्या सुरक्षिततेच्या धोक्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कॅनडातील इक्लुइट विमानतळावर विमानाची लँडिंग करण्यात आली आहे. सध्या विमानाची सुरक्षा प्रोटोकॉलनुसार पुन्हा तपासणी करण्यात येत आहे.

माहितीनुसार, मंगळवारी एका सोशल मीडिया हँडलद्वारे युनायटेड स्टेट्सला जाणाऱ्या एका विमानासह चार फ्लाइट्सना बॉम्बच्या धमकीचे मेसेज मिळाले होते. यानंतर विविध विमानतळांवर विशेष दहशतवादविरोधी पथकांसह सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ज्या चार विमानांना धोका होता, त्यात जयपूर ते अयोध्या मार्गे बेंगळुरू, स्पाइसजेटचे विमान (SG116), सिलीगुडी ते बेंगळुरू (QP 1373) आणि एअर इंडिया फ्लाइट (AI 127) दिल्ली ते शिकागो या विमानाचा समावेश आहे.

शरद पवारांचं टेन्शन वाढलं; निवडणूक चिन्हात ‘पिपाणी’ राहणारच! 

Flightradar24 नुसार, एअर इंडियाच्या फ्लाइट नंबर AI-127 ने नवी दिल्लीहून शिकागोसाठी रात्री 3:00 वाजता टेक ऑफ केले होते आणि शिकागोमध्ये लँडिंग करणार होते मात्र त्यापूर्वी ईमेलद्वारे या विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली त्यामुळे कॅनडामध्ये विमानाची  इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. संध्याकाळी ५.३८ पर्यंत विमान कॅनडाच्या विमानतळावरच होते आणि पुढे टेक ऑफ झाले नव्हते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube