ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी कर्णधार दुखापतीमुळे बाहेर

Pat Cummins Ruled OUT India Series : भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के बसले आहेत. काल मिशेल स्टार्कने (Mitchell Starc) टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर, आता ऑस्ट्रेलियन टीमचा कर्णधार पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट हाती आली आहे. 2023 चा वनडे वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार पॅट कमिन्स सध्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळेच या वर्षाअखेर सुरू होणाऱ्या ॲशेस मालिकेपर्यंत तो कोणत्याही प्रकारचा क्रिकेट सामना खेळू शकणार नाही. पॅट कमिन्सच्या पाठीच्या हाडाला झालेल्या ताणामुळे त्याला खेळता येणार नाही. म्हणजेच न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध होणाऱ्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेतून तो बाहेर राहणार आहे.
GST Council Meeting: कपडे, शूज आणि कार होणार स्वस्त? आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
पॅट कमिन्सची अनुपस्थिती भारतासाठी फायदेशीर
अॅशेससाठी स्वतःला तंदुरुस्त करण्यासाठी कमिन्स (Pat Cummins) क्रिकेटपासून दूर राहणार आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत भारताला निश्चितच आघाडी मिळेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या द्विपक्षीय मालिकेत भारताला तीन एकदिवसीय (ODI) आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियातील या सर्व सामन्यांसाठी भारतीय फॅन झोनची तिकिटे आधीच विकली गेली आहेत.
रोहित-विराटसाठी मोठा दिलासा
रोहित शर्मा आणि विराट कोहली फेब्रुवारीमधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर त्यांचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्यांवर होणार आहे. परंतू आता त्यांना पॅट कमिन्सचा (Pat Cummins) सामना करावा लागणार नाही. त्यामुळे ते निश्चितच सुटकेचा नि:श्वास सोडणार आहेत. पॅट कमिन्ससारख्या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने या दिग्गज जोडीविरुद्ध बरीच यशस्वी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमिन्सने रोहित-विराटला एकत्रितपणे 19 वेळा बाद केले आहे.
मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू; प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कमिन्सला (Pat Cummins) अलीकडेच वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. या विश्रांतीनंतरही, वेस्ट इंडिज कसोटी दौऱ्यापासून कमिन्सला पाठीच्या खालच्या भागात दुखते आहे. चौकशीतून दिसून आले आहे की, पाठीला ताण असल्याने, येत्या काही महिन्यांत त्याला पुढील व्यवस्थापनाची आवश्यकता असेल. भारताविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी कमिन्सची निवड होणार नाही. तो त्याचे आरोग्य पुर्ववत करणे सुरू ठेवेल. त्यानंतर त्याच्या अॅशेस तयारीचा भाग म्हणून गोलंदाजीकडे परतण्याचा निर्णय घेण्यात येईल.