मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू; प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Manoj Jarange Patil hospitalised after hunger strike : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसले होते. जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण काल सोडले असून उपचारासाठी ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईवरून परततल्यानंतर रात्री उशिरा ते गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
भारतावर टॅरिफ लादल्यामुळे मिळाली ऑफर, ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक
उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे, त्यांना किमान दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या असल्याचंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. पाच दिवसांच्या उपोषणामुळं मनोज जरांगे पाटील यांना प्रचंड थकवा जाणवत आहे. तसेच त्यांची शारीरिक स्थिती नाजूक असल्याची माहिती डॉक्टर विनोद चावरे यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्बेतीत सुधारणा होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती देखील चावरे यांनी दिली.
मोठी बातमी! भारताची समुद्री ताकद वाढणार, नौदलाला मिळणार 9 नव्या पाणबुड्या
मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 5 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची लढाई सुरू केली होती. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी करत हैदराबाद आणि सातारा गॅझेटचीही मागणी केली होती. यासह, मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची आणि आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी देण्याची मागणी केली होती.
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?
हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय, आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी, मराठा आंदोलकांवरील केसेस मागे, प्रलंबित जात पडताळणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या.
मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या प्रलंबित?
सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी 1 महिन्याची मुदत, मराठा-कुणबी एकच शासन निर्णयासाठी 2 महिन्यांची मुदत मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) या मागण्या प्रलंबित आहेत.