भारतावर टॅरिफ लादल्यामुळे मिळाली ऑफर, ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Donald Trump Trade India US Zero Tariff Offer : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांच्या टॅरिफ (Tariff) वॉरमुळे जगभरात गोंधळ उडाला आहे. भारतावरील 50 टक्के टॅरिफला विरोध आहे. आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावरील टॅरिफबाबत मोठे विधान केले आहे.
भारताने सर्व शुल्क ‘शून्य’
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्कॉट जेनिंग्ज यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, टॅरिफ लादल्यानंतर भारताने मला एक ऑफर दिली होती. आता भारतावर कोणतेही टॅरिफ लावले जाणार नाहीत. जर मी भारतावर टॅरिफ लादले नसते, तर त्यांनी मला ऑफरही दिली नसती. यापूर्वी ट्रम्प म्हणाले होते की, भारताने सर्व शुल्क ‘शून्य’ करण्याची ऑफर दिली आहे, तर त्यांनी असेही म्हटले होते की, आता खूप उशीर झाला आहे.
भारतीय आयातीवर 25 टक्के कर
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते की, काही लोकांना वाटते की आम्ही भारतासोबत खूप कमी व्यापार करतो, परंतु ते आमच्यासोबत खूप व्यापार करतात, ते आम्हाला मोठ्या प्रमाणात वस्तू विकतात, परंतु आम्ही त्यांना खूप कमी वस्तू विकतो.गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के कर लादला होता. यामध्ये 7 ऑगस्ट रोजी अमेरिकेत होणाऱ्या भारतीय आयातीवर 25 टक्के कर लादण्यात आला होता. 27 ऑगस्ट रोजी रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त 25 टक्के कर लादण्यात आला होता.
मोठी बातमी! भारताची समुद्री ताकद वाढणार, नौदलाला मिळणार 9 नव्या पाणबुड्या
हिताशी तडजोड करणार …
ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी पुनरुच्चार केला की भारत आपल्या देशांतर्गत चिंतांना प्राधान्य देईल आणि शेतकरी, लघु उद्योग आणि पशुपालकांच्या हिताशी तडजोड करणार नाही.