मोठी बातमी : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर; या नवीन खेळाडूंची ‘एन्ट्री’

  • Written By: Published:
मोठी बातमी : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर; या नवीन खेळाडूंची ‘एन्ट्री’

Indian Squad For Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर (Border Gavaskar Trophy) ट्रॉफीसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच कसोटी सामने खेळणार आहे. तीन खेळाडूंची संघात एन्ट्री झाली आहे. अभिमन्यू ईश्वरन, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा यांची संघात एन्ट्री झाली आहे.

भारताचा टी 20 संघ

सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार व्यषक, आवेश खान, यश दयाल

मयंक यादव आणि शिवम दुबे हे दोघे दुखापतग्रस्त असल्यानं त्यांना संघात स्थान देण्यात आलं नाही. तर, रियान पराग देखील दुखापतग्रस्त असल्यानं त्याला संघात स्थान मिळालं नाही, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी 20 मालिका 8 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. 8 नोव्हेंबर, 10, 13 आणि 15 तारखेला चार टी 20 सामने होणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतील लढतीनंतर पहिल्यांदा आमने सामने येणार आहेत.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद सिराज , आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.राखीव: मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक

पहिला सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ.

दुसरा सामना, 6 ते 10 डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट).

तिसरा सामना, 14 ते 18 डिसेंबर, गाबा.

चौथा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न.

पाचवा सामना, 3 ते 7 जानेवारी, सिडनी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube