Mumbai Highway Accident- ANC – शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे कंटेनरने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मजूरांना चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून यात जवळपास 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर जवळपास 10 ते 15 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात, पाहा व्हिडिओ…#accident #Maharashtra #mumbai #Agra #Highway pic.twitter.com/4Er7lYZof6
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 4, 2023
प्रशासनातर्फे बचावकार्य तात्काळ करण्यात येत आहे. सध्या जखमींना शिरपूर शासकीय रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे. तर यात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यासंबंधीच्या मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रागांच्या जवळ असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात उतार आहे. या उतारावर मध्य प्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने थेट पळासनेर गावाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये घुसला आहे. या कंटेनरने अन्य काही वाहनांना देखील जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गाडीतील काही जणांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
यासंबंधीच्या मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार, धुळ्यातील मुंबई- आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ मंगळवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने भरधाव वेगातील १४ चाकी कंटेनर थेट हॉटेलमध्ये शिरला आहे. या भीषण अपघातात १५ जणांचा चिरडून मृत्यू झाला. तर जवळपास २८ जण जखमी झाले आहेत.