Ram Shinde : धुळे येथे विधीमंडळाची अंदाज समिती दौऱ्यावर असताना विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील (Kishore Patil) यांना निलंबित करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी दिली आहे.
माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी विधिमंडळ आमदाराच्या समितीतील सदस्यांना देण्यासाठी तब्बल साडेपाच कोटी रुपये विश्रामगृहात ठेवल्याचा आरोप केला होता. यानंतर या प्रकरणात विरोधकांकडून राज्य सरकारवर चारही बाजूने टीका होत होती. तर आता या प्रकरणात मोठा निर्णय घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती गठित करण्यात येणार असल्याची घोषणा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात एसआयटी (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली होती.
धुळे (Dhule) शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस (Gulmohar Rest House) या ठिकाणी जालना विधानसभा अंदाज समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती. या खोलीची झडती घेतली असता या खोलीत 1 कोटी 84 लाख 84 हजार रुपये सापडले आहे.
तर दुसरीकडे या समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांनी या प्रकरणात विरोधकांकडून सरकारला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.
जिल्हा धुळे येथे विधीमंडळाची अंदाज समिती दौऱ्यावर असताना विधिमंडळाचे संशयित कक्षअधिकारी श्री किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आले असून , संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती गठित करण्यात येत आहे.
– प्रा राम शिंदे .
सभापती ,
महाराष्ट्र विधानपरिषद.— Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@RamShindeMLA) May 22, 2025
अंदाज समितीत कोण ?
समिती प्रमुख हे आमदार अर्जुन खोतकर असून समिती सदस्य आमदार काशिराम पावरा, दिलीप बोरसे, मंदा म्हात्रे, मनिषा चौधरी, किशोर पाटील, किरण सामंत, शेखर निकम, कैलास पाटील, सदाशिव खोत, राजेश राठोड यांच्यासह विधीमंडळाचे अप्पर सचिव (समिती) दामोदर गायकर हे 11 जण उपस्थित असल्याल्या बाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पती घरी नसताना मारहाण अन्…, हगवणे कुटुंबाबाबत मोठ्या सूनेचा धक्कादायक खुलासा