अनिल गोटेंनी राष्ट्रवादी भवनाला कुलूप लावताच…दोन गट भिडले ! दादांचा गट पडला भारी

  • Written By: Published:
अनिल गोटेंनी राष्ट्रवादी भवनाला कुलूप लावताच…दोन गट भिडले ! दादांचा गट पडला भारी

धुळेः राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदाचा अनिल गोटे (Anil Gote) यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्षाचे कार्यालय सोडले. त्यानंतर पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) दोन गटामध्ये जोरदार चकमक झाली आहे. अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीचे भवनाचे कुलूप तोडून ताबा घेतला आहे. दोन्ही गटातील कार्यकर्ते आक्रमक झाल्याने काही वेळ गोंधळ उडाला होता. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केला आहे. दोन्ही गट पुन्हा आमने-सामने आल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून राष्ट्रवादी भवनाला पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. Dhule ncp office conflict between ajit pawar and sharad pawar group)

अमेरिकन खासदार 15 ऑगस्टला पाहुणे: आजोबा होते स्वातंत्र्यसैनिक, गांधीजींसोबत तुरुंगातही गेले

अनिल गोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गोटे हे शरद पवार यांची साथ सोडणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. ते दुसऱ्या पक्षात जाणार आहेत. परंतु अद्याप त्यांनी निर्णय जाहीर केलेला नाही. उद्या ते निर्णय जाहीर करणार आहेत. गोटे यांनी राष्ट्रवादी भवनातील त्यांचे साहित्य ताब्यात घेतले. भवनाला कुलूप लावून ते निघाले होते. त्याचवेळी शरद पवार व अजित पवार गटाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादी भवनाकडे आले. या भवनाचा ताबा घेण्यावरून दोन्ही गटामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती.

भाजप निधी वाटपात शिवसेनेला डावलते; अर्जुन खोतकरांच्या आरोपाने खळबळ

शरद पवार गटाकडून रणजितराजे भोसले, रईस काझी, जोसेफ मलबारी हे भवनाकडे आले होते. तर अजित पवार गटातर्फे सारंग भावसार, गणेश जाधव हे भवनात आले. दोन्ही गटाकडून भवनाचा दावा सांगण्यात येत होते. शेवटी अजित पवार गटाने भवनाचे कुलूप तोडून ताबा घेतला. जोरदार गोंधळ सुरू असताना पोलिसही घटनास्थळी आले आहे. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube