Download App

भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष दोन्ही मुलींचे राजकारण ‘महाराष्ट्रात’ करणार सेट : दोन मतदारसंघांमध्ये चर्चा

धुळे : गुजरातचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील (C.R.Patil) यांच्या दोन्ही मुलींचे राजकारण महाराष्ट्रात सेट होण्याची शक्यता आहे. पाटील यांची पहिली कन्या आणि धुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा धरती देवरे (Dharati Devre) यांचे नाव धुळे लोकसभा मतदारसंघातून चर्चेत आहे. धुळ्याचे भाजपेच विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamare) यांच्या जागी देवरे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (Dhule Zilla Parishad Chairperson Dharti Devare’s name is in discussion from Dhule Lok Sabha Constituency.)

देवरे कुटुंबीय हे धुळ्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ मानले जातात. धरती देवरे यांचे आजे सासरे शिवाजी रायमल देवरे यांनी काँग्रेसकडून धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भुषविले आहे. त्यानंतर सासरे सुभाष देवरे हेही काँग्रेसमध्येच सक्रिय होते. त्यांच्या सहभागाशिवाय कॉँग्रेसचे निर्णय होत नव्हते. त्यांनीही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भुषविले. काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे ते शालकही आहेत.

पुन्हा अशी दमदाटी केली तर, मला शरद पवार म्हणतात; काकांची अजितदादांच्या शिलेदाराला तंबी

पण त्यानंतर सुभाष देवरे यांनी भाजपची वाट धरली. आता नुकतीच धरती देवरे यांचीही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. एकाच कुटुंबातील सलग तिसरी पिढी या पदावर पोहोचली आहे. आता याच धरती देवरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या वाढविण्यासाठी भाजपकडून भर देण्यात येत आहे, त्यातूनच देवरे यांचे नाव चर्चेत आले आहे.

Sujay Vikhe : ‘कोल्हेंच्या आमंत्रणाला मी किंमत देत नाही’; खासदार विखेंचा खोचक टोला

त्याचवेळी पाटील यांची दुसरी मुलगी भाविनी पाटील या देखील राजकाणात सक्रिय आहेत. त्या जामनेर तालुक्यातील मोहाडी गावच्या ग्रामपंचायत सदस्या आहेत. त्यांनी पाच वर्षे मोहाडी गावचे सरपंचपदही सांभाळले आहे. मात्र दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्या पॅनलचा पराभव झाला; परंतु त्या स्वतः सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून गिरीश महाजन यांना तिकीट मिळण्याची शक्यात आहे. यावेळी हा राजकीय बदल झाल्यास जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून भाविनी पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

चंद्रकांत पाटील कोण आहेत?

मूळचे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्याचे रहिवासी असलेले चंद्रकांत रधुनाथ पाटील हे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच ते गुजरातमधील नवसारीचे खासदारही आहेत. पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. त्यामुळे धुळे आणि जळगावमध्ये सून म्हणून आलेल्या त्यांच्या दोन्ही कन्यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळेल असे सांगण्यात येत आहे. असे झाले तर त्यांच्या दोन्ही मुलींचे राजकारण महाराष्ट्रात सेट होणार आहे.

follow us