Sujay Vikhe : ‘कोल्हेंच्या आमंत्रणाला मी किंमत देत नाही’; खासदार विखेंचा खोचक टोला

Sujay Vikhe : ‘कोल्हेंच्या आमंत्रणाला मी किंमत देत नाही’; खासदार विखेंचा खोचक टोला

Sujay Vikhe replies Amol Kolhe : नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचं मैदान (Lok Sabha Election) तयार होत आहे. नगर दक्षिण मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार अशीच परिस्थिती दिसत आहे. दोन दिवसांपू्र्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी नगरमध्ये हजेरी लावली. आमदार निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे आयोजित महानाट्यासाठी ते नगरमध्ये होते. यावेळी कोल्हेंनी नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि दक्षिणेतून तुतारी वाजवावी अशी ऑफर दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले आहे.

या ऑफरवर नीलेश लंके यांनी अद्याप काही निर्णय घेतला नसला तरी कोल्हे यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी त्यांच्या या वक्तव्यावर खोचक टीका केली आहे. अमोल कोल्हे यांच्या आमंत्रणाला मी फार किंमत देत नाही. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही. पण, एक गोष्ट सांगू इच्छितो त्यांना आता लोकांची गरज आहे कारण, तिथं दुसरा कुणी तयारही नाही.

निलेश लंकेंनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा; कोल्हेंचं मंचावरूनच सूचक विधान

मला असा एक व्यक्ती महाविकास आघाडीतील सांगा जो म्हणाला की मी नगरमध्ये निवडणूक लढायला इच्छुक आहे अशी इच्छा व्यक्त केली असेल. इथे स्पर्धाच नाही. त्यांना कु्णीच भेटत नसल्या कारणाने तुम्ही या, तुम्ही या अशी प्रलोभने दाखवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायही राहिलेला नाही.

जशी भाजपात स्पर्धा आहे. राम शिंदे इच्छुक आहेत. भानुदास बेरड इच्छुक आहेत. मी इच्छुक आहे आणखी कुणी असेल तर मला माहिती नाही. आमच्यात निदान स्पर्धा तरी आहे. पण, महाविकास आघाडीत एकही माणसाने इच्छा व्यक्त केली नाही म्हणून ती जागा रिक्तच आहे. आता हे का घडतंय याचा विचार त्यांनी केला पाहिजे. बाकी अमोल कोल्हेंच्या आमंत्रणाला मी फार किंमत देत नाही. रिकाम्या जागा भरण्याची ज्याची इच्छा असेल त्याने ते करावं, असा टोला विखे यांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube