निलेश लंकेंनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा; कोल्हेंचं मंचावरूनच सूचक विधान

निलेश लंकेंनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा; कोल्हेंचं मंचावरूनच सूचक विधान

Amol Kolhe News : आमदार निलेश लंकेंनी (Nilesh Lankde) लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं सूचक विधान शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी थेट मंचावरूनच केलं आहे. दरम्यान, अहमदनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज महानाट्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महानाट्य संपल्यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी निलेश यांना शरद पवार गटाचं आमंत्रणच दिलं असल्याची चर्चा रंगली आहे.

छत्रपतींनी हाती ‘मशाल’ धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल; शाहू महाराजांच्या उमेदवारीवर राऊतांनी स्पष्टच सांगितलं

अमोल कोल्हे बोलत असतानाच जनतेमधून ‘निलेश लंके खासदार’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावर कोल्हे म्हणाले, हे जे तुमच्या मनात आहे. लोकनेत्यांना जर वाढदिवसांचं गिफ्ट द्यायचं असलं तर मी मागतोयं ते म्हणजे दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा लोकनेता निलेश लंके संसदेत राहील. आता लोकनेते निलेश लंके यांनीच लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि नगर दक्षिणेतून तुतारी वाजवावी, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

तीन पक्ष फिरुन येणारांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत; अजित पवारांचा रडारवर पुन्हा अमोल कोल्हे

तसेच आज महाराष्ट्र शरद पवारांकडे एक संघर्षयोद्धा म्हणून बघतोयं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे लढतोयं. छत्रपतींचा हा इतिहास काय प्रेरणा देतो, हीच की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकत नाही आणि झुकणार नाही. मागील काही दिवस आपण बघतोयं कांदा बंदी, सोयाबीनचे भाव पडले आहेत, आपल्या राज्यातून 48 खासदार संसदेत निवडून जातात , त्यातील सत्ताधारी खासदार मूग गिळून बसतात.

अनंत- राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याला अनेक बॉलीवूड आणि हॉलिवूड कलाकार झळकले, पाहा फोटो

सत्ताधारी खासदार त्यावर कोणीही बोलत नाही. महापुरुषांचा अवमान केला तरीही खासदार बोलत नाहीत. मग प्रश्न पडतो येणाऱ्या लोकसभेत दिल्लीतून गुबू गुबू वाजल्यानंतर मान डोलवणारे नंदीबैल पाठवायचेत की महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारे वाघ पाठवायचेत, अशी खोचक टीका अमोल कोल्हे यांनी सत्ताधारी खासदारांवर केली आहे.

दरम्यान, महानाट्य कार्यक्रमावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, नगरकरांनी महानाट्य कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला आहे. निलेश लंके यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचं आभार मानतो. अनेक पत्रकारांनी मला विचारलं की विरोधक माझ्या शिरुर मतदारसंघात मला घेरण्यास येत असताना तुम्ही नगरला का येत आहात. त्यावर मी म्हणालो, पद राजकारण सर्व बाजूला छत्रपती महत्वाचे आहेत. त्यांचा इतिहास मांडलाच पाहिजेत, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज