Download App

रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक, राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द

18 lakh Bogus Ration Cards Cancelled In State : रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी (Bogus Ration Card) आहे. केंद्र सरकारने राज्यात तब्बल 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले (Digital Strike) आहेत. राज्यामध्ये सध्या रेशनकार्ड ई-केवायसी (E KYC) मोहिम राबवण्यात येतेय. या मोहिमेमुळे सरकारच्या अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या लाखो व्यक्तींना चांगलीच (Ration Cards Cancelled) चपराक बसली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाच्या घरावर दरोडा, डोक्याला बंदूक लावून लुटली कोट्यावधींची संपत्ती

ई-केवायसी मोहिमेअंतर्गत तब्बल 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. राज्यामध्ये आधार लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी मोहिम सुरू केली होती. राज्यातील दीड कोटींहून अधिक रेशन कार्डधारकांचे ई-केवायसी अजून प्रलंबित असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने दिली आहे.

नोकरी, प्रेम, पैसा… कोणाच्या नशिबात काय? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य

गलेलठ्ठ पगार, सरकारी नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, श्रीमंतांची रेशन कार्ड केंद्र सरकारच्या डिजिटल स्ट्राईकमुळे मोहिमेमुळे रद्दबातल होत आहेत. ते रेशन कार्डच्या आधारे दर महिन्याला धान्य घेत होते. विशेष म्हणजे हे धान्य गृहउद्योग, कुक्कुटपालन आणि इतर ठिकाणी विक्री होत असल्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. तर यामुळे खरे लाभार्थी मात्र वंचितच राहतात, असं देखील बोललं जातंय. यामुळेच आधार कार्डच्या साहाय्याने ई-केवायसी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

एकूण किती रेशन कार्ड रद्द?

आधार लिंकसाठी केंद्र सरकारच्या ई-केवायसी मोहिमेमध्ये राज्यातील 17.95 लाख रेशन कार्ड रद्द झाल्याचे आकेडवारीत समोर आलंय. तर दीड कोटींहून जास्त कार्डधारकांची ई-केवायसी प्रलंबित आहे.

1. मुंबईत सर्वाधिक रेशन कार्ड रद्द झाले. मुंबईत 4.80 लाख तर ठाण्यात 1.35 लाख रद्द झाले आहेत.

2. राज्यात 6.85 कोटी कार्डपैकी 5.29 कोटींचे ई-केवायसी पूर्ण झाले. 1.65 कोटींची ई-केवायसी प्रलंबित आहे.

3 .बनावट कागदपत्रांमुळे बांग्लादेशी नागरिकांनाही रेशन कार्डचा लाभ मिळत आहे.

4. ई-केवायसीत भंडारा, गोंदिया, सातारा जिल्हे आघाडीवर आहेत.

5. रेशनकार्ड ई-केवयासी मोहिमेत मुंबई, पुणे, ठाणे जिल्हे पिछाडीवर आहेत.

6.अंतिम मुदत संपल्यानंतर शासन निर्देश येईपर्यंत, केवायसी सुरू राहणार असून लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

follow us