पदवीपेक्षा कौशल्य, आवडीला व्यवसायाची जोड द्या’; अलार्ड विद्यापीठातर्फे ‘Diksharambh 2026’ कार्यक्रम उत्साहात

Diksharambh 2026 : विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर भर न देता आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्याला व्यवसायाची जोड द्यावी.

Diksharambh 2026

Diksharambh 2026

Diksharambh 2026 : विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर भर न देता आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्याला व्यवसायाची जोड द्यावी. आवड आणि व्यवसाय यांची सांगड घातल्यास उत्कृष्टता आपोआप प्राप्त होते, असा सल्ला ज्येष्ठ आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी दिला. अलार्ड विद्यापीठ पुणेच्या वतीने नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ २०२६’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे बोलत होते. अलार्ड विद्यापीठ पुण्याचे संस्थापक अध्यक्ष तथा कुलपती डॉ. एल. आर. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

यावेळी व्होडाफोन शेअर्ड सर्व्हिसेस इंडियाचे जनरल मॅनेजर डॉ. मिलिंद कौळगीकर, अल्गोवर्क्सचे व्हाइस प्रेसिडेंट आशिष बांका तसेच सकाळ महाराष्ट्र आणि गोवाचे चीफ मॅनेजर श्यामसुंदर माडेवार, अलार्ड विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. सोहन चितलांगे, विद्यापीठाचे कुलसचिव चंद्रशेखर जाजू ,आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपक शिकारपूर म्हणाले, आयटी क्षेत्रातील आपल्या अनुभवांच्या आठवणी सांगताना शिकारपूर यांनी गायक शंकर महादेवन यांच्या कारकिर्दीचा दाखला दिला. १९८७ मध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या महादेवन यांनी आयटी क्षेत्रात न जाता संगीताची निवड केली आणि त्यात यश मिळविले. यावरून विद्यार्थ्यांनी समाजाच्या अपेक्षांपेक्षा स्वतःची आवड आणि क्षमता ओळखणे महत्त्वाचे आहे. ‘पी प्लस पी इक्वल्स ई’ हा शंकर महादेवन यांच्या करिअरचा नियम असल्याचे सांगत त्यांनी ‘पॅशन प्लस प्रोफेशन इक्वल्स एक्सलन्स’ असे सूत्र मांडले. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या उदाहरणातूनही त्यांनी आवडीच्या क्षेत्रात सातत्याने काम करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

डॉ. मिलिंद कौळगीकर म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता,मशीन लर्निंग आणि डेटा तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्याने विद्यार्थ्यांनी सतत नवे तंत्रज्ञान शिकत व्यावहारिक व सर्जनशील राहावे, मोबाईल व रील्सवर वेळ घालवण्याऐवजी त्यामागील सर्जनशीलतेचा विचार करावा. डेटा क्षेत्रातील संधी आणि आव्हाने वाढत असून, विद्यार्थ्यांनी आपल्या कमतरतांपेक्षा सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यात तज्ज्ञता मिळवावी, असा संदेश त्यांनी दिला.

आशिष बांका म्हणाले, स्वतःच्या कमाईवर उभे राहण्याची जिद्द बालपणी आजीने दिलेल्या शिकवणीतून माझ्यात निर्माण झाली, आयुष्यात आनंदी राहणे, तुलना आणि स्पर्धेच्या चक्रात न अडकता सातत्याने प्रयत्न करणे, योग्य मार्गदर्शकाची साथ घेणे आणि पालकांचा सन्मान करणे आवश्यक आहे. अपयशाला घाबरू नका; प्रत्येक अपयशातून स्वतःला नव्याने ओळखण्याची आणि शिकण्याची संधी मिळत असते. २०११ मध्ये सरकारी नोकरी सोडून एच आर क्षेत्रात प्रवेश करताना सलग चार महिन्यांत ४८ मुलाखती दिल्या. अखेर कोलकात्यात सात हजार रुपयांची पहिली नोकरी मिळाली. त्यानंतर मेहनतीच्या जोरावर कतार एअरवेज, रिलायन्स, टाटा आणि ओपनएआयशी संबंधित जागतिक कंपन्यांमध्ये काम केले. मेहनतीशिवाय यश मिळत नाही, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

डॉ. सोहन चितलांगे म्हणाले, “ॲटिट्यूड, लीडरशिप, अलर्टनेस, रेडिनेस आणि डेडिकेशन” या पाच स्तंभांवर आमचे विद्यापीठ कार्यरत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने संशोधनाला महत्त्व दिले पाहिजे. संशोधन हीच आपल्या प्रगतीची पुढची पायरी आहे, तर नेटवर्किंग हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त, अथक परिश्रम, सक्रिय सहभाग आणि दूरदृष्टी या गुणांचा अवलंब करणे आवश्यक आहे. या गुणांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवल्यास प्रत्येक विद्यार्थी आपल्या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल करू शकतो. सूत्रसंचालन प्रभंजन नलावडे यांनी केले. प्रा डॉ. मनिषा भेंडे प्रास्ताविक यांनी केले. तर आभार प्रा. गणेश शितोळे यांनी मानले.

World Cup 2027 साठी वेस्ट इंडिज थेट पात्र ठरण्यात अपयशी; पुढे काय?

विद्यार्थ्यांनी स्वप्ने मोठी पाहावीत

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत; मात्र स्वप्नांसोबत कृतीही आवश्यक आहे. पदवी ही करिअरची केवळ सुरुवात असून संवादकौशल्य, तांत्रिक कौशल्य आणि परदेशी भाषांचे ज्ञान भविष्यातील करिअरसाठी महत्त्वाचे ठरणार आहे, असेही शिकारपूर यांनी नमूद केले.

Exit mobile version