World Cup 2027 साठी वेस्ट इंडिज थेट पात्र ठरण्यात अपयशी; पुढे काय?
World Cup 2027 : पुढील होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2027 साठी आयसीसीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका
World Cup 2027 : पुढील होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2027 साठी आयसीसीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेसाठी आतापर्यंत भारतासह 10 संघांनी पात्रता मिळवली आहे. तर आणखी चार जागांसाठी इतर संघांना पात्राता फेरीचे सामने खेळावे लागणार आहे. 2023 नंतर या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा वेस्ट इंडिज संघाला थेट पात्रता मिळाली नाही त्यामुळे आता वेस्ट इंडिज संघाला पात्रता फेरीतून प्रवेश मिळवला लागणार आहे.
1975 आणि 1979 मध्ये एकदिवसीय (ODI) विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला आता 2027 च्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याकरिता पात्रता स्पर्धेत खेळावे लागेल. या वर्षीच्या 30 सप्टेंबरपर्यंतच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल आठ संघांसाठी 2027 च्या विश्वचषकात थेट प्रवेश राखीव ठेवण्यात आला होता. यजमान देश असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे व्यतिरिक्त, उर्वरित संघांना या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणे आवश्यक होते.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ
बेलफास्ट येथे आयर्लंडवर रोमांचक विजय मिळवल्यानंतर अफगाणिस्तानने विश्वचषकात थेट प्रवेश निश्चित केला. आता ते गतविजेता ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्या पंक्तीत सामील झाले आहेत. दक्षिण आफ्रिका संघ अव्वल आठमध्ये समाविष्ट असल्याने अव्वल आठच्या बाहेर असलेल्या सर्वोच्च क्रमांकाच्या संघाला म्हणजेच नवव्या क्रमांकाच्या संघाला थेट पात्र ठरण्याची संधी मिळाली आणि बांगलादेशने ती जागा पटकावली.
जर 30 सप्टेंबरपर्यंत झिम्बाब्वे (Zimbabwe) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) हे दोन्ही संघ अव्वल आठमध्ये असते, तर अव्वल 10 क्रमांकांचे संघ थेट पात्र ठरले असते. त्याऐवजी, आता 14 संघांच्या या स्पर्धेतील उर्वरित चार जागा निश्चित करण्यासाठी पात्रता सामने खेळवले जातील. या स्पर्धेसाठी 10 संघांचे स्थान आधीच निश्चित झाले आहे. वेस्ट इंडिज सध्या 10 व्या स्थानावर आहे. त्यांचे अजून दोन सामने बाकी आहेत आणि दोन्ही भारताशी आहेत पण ते जिंकूनही अव्वल 9 मध्ये स्थान मिळवणे पुरेसे ठरणार नाही. बांगलादेशकडे 83 गुण आहेत, तर कॅरिबियन संघाकडे 77 गुण आहेत.
2027 च्या विश्वचषकासाठी पात्रता फेरी पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत, तरीही यजमान देशाचा निर्णय अद्याप झालेला नाही. पात्रता फेरीतील विजेता संघ 2027 च्या विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत थेट प्रवेश मिळवेल, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहणारे संघ पहिल्या फेरीतील मालिकेत (ज्याला ‘सुपर सिरीज’ म्हटले जाते) भाग घेतील आणि त्यापैकी केवळ एकच संघ पुढे जाईल.