दिशा सालियन प्रकरणात CBI ची मोठी कारवाई ; 6 वर्षांनंतर गुन्हा दाखल

Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात अखेर सहा वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Disha Salian

Disha Salian

Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात अखेर सहा वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये नेमकं कोणाला आरोपी करण्यात आले आहे याबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दोन दिवसांपूर्वी दिशाचे वडील सतिश सालियान यांनी सीबीआयकडे आपला जबाब नोंदवला होता. त्यानुसार आता या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दिशा सालियन (Disha Salian) दिवंगत अभिनेता सुशाांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर म्हणून काम पाहत होती मात्र सुशांतच्या मृत्यूपूर्वी अवघ्या 6 दिवस अगोदर दिशाचा मृत्यू झाला होता. दिशाने आत्महत्या केली असं सांगण्यात येत आहे मात्र दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे.

दिशावर अत्याचारकरुन तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप देखील करण्यात येत होता. मात्र आता या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहा वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. दिशा सालियन प्रकरणात कलम 302, 376, 120 ब, 210 पुरावे नष्ट करणे, 217 आणि 218 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू

8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून दिशाचा मृत्यू झाला होता. तर 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. या प्रकरणात दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन नव्यानं चौकशी करण्याची आणि सीबीआयद्वारे तपास करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

मनोज जरांगे पाटलांच्याच्या मुंबईला जाण्याच्या निर्णयात मोठा बदल; समर्थकांना केलं महत्वाचं आवाहन

Exit mobile version