मनोज जरांगे पाटलांच्याच्या मुंबईला जाण्याच्या निर्णयात मोठा बदल; समर्थकांना केलं महत्वाचं आवाहन

Manoj Jarange Hunger Strike Update : देवेंद्र फडणवीस यांनी सणासुदीच्या काळात आपल्या विरोधात डाव टाकल्याचा आरोप जरांगे यांनी केला.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 14T124114.653

Manoj Jarange Hunger Strike Update : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईला जाण्याच्या निर्णयात मोठा बदल झाला आहे. उद्या हजारो समर्थकांसह मुंबईकडे रवाना होण्याची तयारी केलेल्या जरांगे यांनी आता वेगळी भूमिका घेतली आहे. आपण मुंबईला एकटेच जाणार असल्याचं जाहीर करत, समर्थकांनी आपल्यासोबत मुंबईला येऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मुंबईत धडक देण्याच्या जरांगेंच्या आधीच्या निर्णयाला आता नवं वळण मिळालं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सणासुदीच्या काळात आपल्या विरोधात डाव टाकल्याचा आरोप जरांगे यांनी केला. त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी आपल्यालाही डाव टाकावा लागणार असल्याचं ते म्हणाले. आता आपण एकटेच मुंबईत येणार असल्याने सरकार आपल्याला आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देणार का, असा थेट सवालही जरांगे यांनी फडणवीस सरकारला केला आहे.

follow us