मोठी बातमी: जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली

Manoj Jarange Mumbai Agitation आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली असली तरी मुंबईला जाणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.

Manoj Jarange Mumbai Agitation

Manoj Jarange Mumbai Agitation: मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासंदर्भात परवानगीची मागणी केली होती, मात्र मुंबई पोलीसांनी त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी (Azad maidan permission) नाकारली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच शाळा, आरोग्य आणि वाहतुकीचं कारण सांगत पोलीसांनी परवानगी नाकारली आहे.

मुंबईत जाऊन मरेन, पण फुटणार नाही; मनोज जरांगेंचा संताप, सरकारवर आरोपांची सरबत्ती

19 सप्टेंबरला जरांगे मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करणार होते. मात्र त्यांना परवानगी नाकारली आहे. पण न्यायालयाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं म्हटलं होतं. जरांगेंना सरकार आंदोलन करण्यापासून रोखू शकत नाही. असेही न्यायालयाने म्हटले होते.

आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली असली तरी मुंबईला जाण्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. मागील वर्षी परवानगी दिली होती, मग यंदा का नाकारली, असा सवाल करत न्यायालय आमच्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी केला.

मनोज जरांगे पाटलांची मुंबईला जाण्याची घोषणा; आमदार रोहित पवारांचा सरकारला महत्वाचा सल्ला

परवानगी नाकारली असली तरी मी मुंबईला जाणार. मागच्या वर्षी आंदोलनाला परवानगी दिली होती, मग आता परवानगी का नाकारली? न्यायालय आमच्या बाजूने आहे. असे जरांगे म्हणाले आहेत.

follow us