जरांगेंच्या मुंबई प्रवेशावरून राऊतांचा सरकारला इशारा; म्हणाले, ‘भीमा-कोरेगावसारखी परिस्थिती झाली तर जबाबदार कोण?
Sanjay Raut on Jarange Agitation : गणेशोत्सव सुरू असताना हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असं राऊत म्हणाले.
Sanjay Raut on Jarange Agitation : मनोज जरांगे पाटील हजारो समर्थकांसह (Jarange) मुंबईत येणार असल्याने ऐन गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारला सावध केलं आहे. परिस्थिती बिघडण्याची वाट न पाहता सरकारने जरांगे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी राऊत यांनी केली. मुंबईत भीमा-कोरेगावसारखी परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला.
गणेशोत्सव सुरू असताना हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असं राऊत म्हणाले. जरांगे यांच्याशी सरकारने चर्चा करावी आणि प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही विश्वासात घ्यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली. मुंबईत सध्या कायद्यापेक्षा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक असल्याचं सांगत, उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी सरकारची असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जरांगे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा विरोध
दरम्यान, अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र प्रवास केल्यावरूनही राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. जरांगे यांच्या समर्थकांना मुंबईत येण्यापासून रोखलं जात असताना सत्ताधारी नेते मोठ्या ताफ्यासह शहरात फिरतात आणि त्यांच्या दौऱ्यामुळे रस्ते बंद होतात, असा आरोप त्यांनी केला. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाल्याचं सांगत राऊत यांनी, “मुंबईची का वाट लावत आहात? मुंबईचा का छळ करत आहात?” असा सवाल केला.
भाजप आमदार पराग शाह यांनी भिकाऱ्याच्या वेषात एक दिवस घालवल्याच्या प्रकाराचंही राऊत यांनी कौतुक केलं. संवेदनशील नेतृत्वाला समाजाची वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी वेषांतर करून सामान्यांमध्ये मिसळता आलं पाहिजे, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही कधी वेषांतर करून मराठवाड्यात जावं आणि तिथला दुष्काळ पाहावा, असा टोला राऊत यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांनी जनतेची परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवण्याची गरज असल्याचंह