Manoj Jarange Patil : पाटलांचा मोर्चा आता मुंबईकडे, चार ठिकाणी करणार मुक्काम; जाणून घ्या मार्ग

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत 29 ऑगस्टपासून आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत 29 ऑगस्टपासून आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या 15 व्या दिवशी मोठी घोषणा करत राज्य सरकारला इशारा दिला आहे.

उपोषणाच्या 15 व्या दिवशी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन होणार आहे. 20 सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलन करणार आहे. हे आंदोलन बेमुदत असणार असल्याची देखील माहिती जरांगे यांनी दिली आहे.

तसेच मुंबईकडे (Mumbai) जात असताना चार ठिकाणी मुक्काम करण्यात येणार असून पहिला मुक्काम बीड (Beed) जिल्ह्यातील पाटोदा येथे दुसरा मुक्काम अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा, तिसरा मुक्काम पुण्यातील (Pune) हडपसर, चौथा मुक्काम रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असणार आहे. तर पाचव्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) आंदोलनाला सुरुवात करणार आहे.

20 तारखेपर्यंत मुंबईत पोहोचणार

ज्या मराठ्यांना शक्य नाही त्यांनी त्यांच्या गाड्यांतून बाकी मराठ्यांना मुंबईत पोहोचावा. शांततेत आंदोलन करायचं. शांततेचा मार्ग कोणी सोडायचा नाही. कोणी जाळपोळ करायची नाही. जे लोक मुंबईला येणार नाही त्यांनी कुटुंबासह तुमच्या भागात आशीर्वाद देण्यास या असं यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच एका दिवसात मुंबईत जाऊ शकत नाही, त्यामुळे मुक्काम करत मुंबईला जावं लागणार. लाखो मराठ्यांच्या गाड्या मुंबईत जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

फडणवीसांनी मराठ्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नये

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, फडणवीसांनी मराठ्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांनी अडवलं तर ती जबाबदारी फडणवीसांचीच असेल आणि अडवलं तर ती जबाबदारी फडणवीसांचीच असेल असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

बॅकअप कार, फूड टेस्टिंग टीम अन् डॉक्टर… शी जिनपिंग यांची BRICS साठी सुरक्षा व्यवस्था काय?

follow us