धक्कादायक! बीड नवगण राजुरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; तीन मित्रांचा जागीच मृत्यू
अपघाताची तीव्रता एवढी होती की, कैलास टूले, अक्षय शिंदे आणि ऋषिकेश फुलझळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
बीड ते नवगण राजुरी मार्गावर भरधाव (Accident) ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडली. उकंडा फाट्याजवळ झालेल्या या अपघातात कैलास टूले, अक्षय शिंदे आणि ऋषिकेश फुलझळके यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मित्र गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या गावी परत जात होते. बीड ते नवगण राजुरी मार्गावरून प्रवास करत असताना उकंडा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगातील ट्रकने जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या धडकेमुळे दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले.
जरांगे खालावले, मराठे पेटले! बीड-जालन्यात जाळपोळीसह मोठा राडा!
अपघाताची तीव्रता एवढी होती की, कैलास टूले, अक्षय शिंदे आणि ऋषिकेश फुलझळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे मार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, धडक देणाऱ्या ट्रकबाबत तसेच अपघाताच्या नेमक्या कारणांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.