Pune Accident : नवले पुलाजवळ भीषण अपघात; डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी…

मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ सोमवारी 8 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.

accident

Pune Accident News : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ सोमवारी दि.8 जून रोजी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात (Pune Accident News) एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झालायं, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. सीमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

भुजबळ साहेब राज्यसभेवर गेले नाहीत तरी मंत्रिपदाचा शब्द; समीर भुजबळांनी फोडली ‘आतली’ बातमी

पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास नवले पुलाच्या उतारावरून येत असताना सीमेंट ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने पुढे जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीवरून जात असलेल्या डिलिव्हरी बॉयला जोरदार धडक बसली. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

गोठ्यात एकही गाय, म्हैस नाही पण दूध 100 लिटर कसं?, बीडच्या आष्टीचं भयान वास्तव

अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. ट्रक चालकही या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण आणि ब्रेक निकामी होण्यामागील तांत्रिक बाबींचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नवले पुलावरील अवजड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

follow us